Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर्डीत जनआक्रोश मोर्चाची हाक

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीशी कथित छेडछाडीच्या घटनेच्या निषेधार्थ 20 जून रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
मोर्चाच्या आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, संबंधित घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून शिर्डीसारख्या जागतिक तीर्थक्षेत्रात महिला व भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


हा मोर्चा शनिवार, 20 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता नगरपालिका जवळील पाण्याच्या टाकीपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने नागरिक, भाविक व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आयोजकांनी सर्व हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जात असल्याचे सांगितले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button