Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
शिर्डी

आदिवासी ठाकूर ठाकर जमातीच्या वतीने शिर्डी येथे राज्यस्तरीय संवाद यात्रा संपन्न

आदिवासी ठाकूर ठाकर जमातीच्या वतीने 2 जून 2024 रविवार रोजी साई पालखी निवारा शिर्डी येथे “मी समाजाचा, समाज माझा” या नव विचारातून संघटना विरहित राज्यस्तरीय संवाद यात्रा संपन्न झाली. मुला/ मुलींच्या लग्नाचे वाढते वय यास जबाबदार कोण ??? या विषयावर संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित जमात बांधवांच्या शुभहस्ते आदिवासीचे जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

प्रथमतः उपस्थित जमात बांधवांचा वैयक्तिक परिचय करून घेण्यात आला .संवाद यात्रेचा उद्देश ,संकल्पना व गरज याबाबत चंद्रकांत सोनवणे यांनी भूमिका स्पष्ट केली .यानंतर श्रीमान ए.पी. ठाकूर मुंबई व रणजीत शिंदे सर अमळनेर यांनी संवाद यात्रा अधिक प्रभावशाली कशी करता येईल. तथापि वैवाहिक वाढलेली सामाजिक दरी कमी करण्यासाठी समाज बांधव म्हणून आपण कसे जबाबदार आहोत याबाबत मार्गदर्शन केले .

kamlakar

पहिल्या फेरीमध्ये जमात बांधवांनी मुला/ मुलींचे वाढते लग्नाचे वय यास जबाबदार कोण ? याबाबत वैयक्तिक मनोगत मांडले. दुपारच्या सत्रामध्ये गटचर्चा करण्याच्या उद्देशाने गट क्रमांक एक व गट क्रमांक दोन तयार करण्यात आले. दोन्ही गटांना.. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे दोन्ही गटाने आपले विचार स्पष्ट केले. यावेळी जमात बांधव अति उत्साहाने कारणे परिणाम आणि उपाय या विषयावरती चर्चा करताना दिसून येत होते. पुढील संवाद यात्रा खानदेश विभागामध्ये लवकरच आयोजित करण्यात येईल असे ठरविण्यात आले. जमात बांधवांना समाज विकासाची शपथ देऊन संवाद यात्रेची सांगता करण्यात आली. या संवाद यात्रेत सर्वश्री वासुदेव ठाकूर , भाऊसाहेब पंढरीनाथ ठाकूर, दिनेशकुमार रोहिदास साळुंके, डॉक्टर मनोहर देवरे, महेश रामराव पवार, दिलीप रघुनाथजी जगताप ,मिलिंद मच्छिंद्र ठाकर , भगवान बापूराव ठाकूर, ज्ञानेश्वर पंडित ठाकूर ,सौ सुलभा महेश पवार ,अशोक प्रभाकर सिसोदिया, हिरालाल काशिनाथ पवार ,भाऊसाहेब पंढरीनाथ ठाकूर, तुकाराम देवराम ठाकूर, दिनेश रामदास ठाकूर ,

जगन्नाथजी चव्हाण ,भगवान संकपाळ, किशोर कदम,अरुण रामचंद्र ठाकूर ,संतोष संकपाळ, नारायण रामचंद्र ठाकूर ,महेश बाजीराव चव्हाण ,नरेंद्र नारायण साळुंके ,दीपक यशवंत चव्हाण , सुदाम पंढरीनाथ ठाकूर, तुकाराम नामदेव भोसले, मनमोहन विश्वनाथ ठाकूर ,स्वाती मनमोहन ठाकूर, एड. अभिजीत दिलीप पवार,विनायक वसंतराव इंगळे ,रामेश्वर चव्हाण, तन्मय सोनवणे,बाबासाहेब पुंजाजी इंगळे ,दत्तात्रय रामभाऊ जगताप, विजय इंगळे, कमलाकरजी चव्हाण, सुजाता कमलाकर चव्हाण ,अनिल लोटन पवार ,योगिता प्रभूराव साळुंके ,संध्या अभिजीत पवार ,सपना सोनवणे आधी जमत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेशजी पवार शिर्डी यांच्या अथक परिश्रमाने सदरची संवाद यात्रा यशस्वी झाली त्याबद्दल जमातीच्या वतीने त्यांचे खूप खूप मनःपूर्वक आभार.🙏

श्रीमान लीलाधरजी ठाकूर, दत्तात्रयजी जाधव, प्रकाशजी भामरे, रामेश्वर ठाकूर ( राम राम पाहुणे छत्रपती संभाजीनगर) जनार्दनजी ठाकूर, योगेश ठाकूर, विजय शालिकराम ठाकूर, विजय जगन्नाथ ठाकूर नाशिक, योगेश ठाकूर कन्नड, रत्नमालाताई सुरडकर, रवींद्र ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी अहमदनगर, शिवाजी कदम पत्रकार जालना ,रमेश ठाकुर नांदेड व शिर्डी येथील संबंधित पत्रकारांनी संवाद यात्रेस शुभेच्छा दिल्या

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button