Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
राजकीयशिर्डी

सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची बाळू सरकली!”

शिर्डी :
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा माहोल अंतिम टप्प्यात धाव घेत असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये एकच व्यक्ती आज चर्चेचं केंद्रबिंदू ठरली आहे — अपक्ष उमेदवार सतिश उर्फ नंदू गोविंदराव गोंदकर!

sai nirman
जाहिरात

आणि याच नंदूभाऊंच्या प्रचंड विजयी लाटेला सर्वात जोरदार शिक्कामोर्तब केलं ते प्रभागातील प्रतिष्ठित भूमिपूत्र, प्रतिथयश हॉटेल व्यावसायिक सुनिल निवृत्ती पाटील शिंदे यांनी!

त्यांनी जाहीरपणे सांगितलं—
“नंदूभाऊंचा विजय हा निवडणूक नाही… तो जनता ठरवलेला निर्णय आहे!” फक्त अंगावर गुलाल घ्यायचा बाकी आहे 

DN SPORTS

“किटलीचा वादळ” — 

नंदूभाऊंचा प्रचार ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहून प्रभागात अक्षरशः शांतता पसरली आहे.
घराघरांत नंदूभाऊ, गल्लीबोळांत किटलीचा नाद आणि सोशल मीडियावर तर एकच ट्रेंड — #KitliJinkणार

सुनिल शिंदे म्हणतात :
“हा साधा प्रचार नाही… हा जनतेचा उठाव आहे!”


शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित मुलगा— वीस-पस्तीस वर्षांची निष्ठा

नंदूभाऊंचा इतिहास स्वच्छ, कामकाज तगडा, बोलणं साधं पण मनाला भिडणारं.
तीस–पस्तीस वर्षे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे निष्ठावंत सैनिक राहून नंदूभाऊंच्या कुटुंबाने प्रभागात विश्वासाची भिंत उभी केली आहे.

kamlakar

त्यामुळेच लोकांनी स्पष्ट सांगितले—
“तिकिट मिळो वा न मिळो… आमचा उमेदवार एकच — नंदूभाऊ!”


अपक्ष होण्यामागे जनता— पक्ष नव्हे!

काही विरोधक मुद्दाम अफवा पसरवताना दिसत आहेत.
पण सुनिल शिंदेंनी पुराव्यासकट स्पष्ट केलं—

“नंदूभाऊ अपक्ष आहेत कारण प्रभागातील लोकांनी आदेश दिला!
ही जनता दिलेली उमेदवारी आहे… कुणाचे तिकीट नाही!”


विजयी रथावर हजारोंचा मेळावा — किटलीला रोखणं आता अशक्य

नंदूभाऊंच्या प्रचारात हजारो युवक, महिला, वयोवृद्ध, शेतकरी, रिक्षावाले, कामगार…
अशी एक लाट उठली आहे की विरोधकांनीही आता गुपचूप हार मानल्याचं चित्र दिसतं आहे.

सुनिल शिंदे म्हणतात—
“किटलीचा वेग एवढा जास्त आहे की घरोघर किटलीचाच  आवाज ऐकू येतात!”


 काही लोकांचे कुटील डाव सुरू… पण जनता सावध

अचानक पाठिंबे, खोट्या चर्चा, चुगल्या आणि गिधाडासारखे उडणारे अफवांचे टोळके —
ही सर्व चिन्हं विरोधक घाबरल्याची!

सुनिल शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला—
“प्रभाग २ ची जनता भोळी नाही. शेवटच्या दिवशी कोणताही विचित्र डाव खेळला तरी फसू नका!”


अंतिम आवाहन : अनुक्रमांक १ — किटली दाबा; नंदूभाऊंना विक्रमी बहुमतानं विजयी करा!

निवडणुकीतील सर्वात चर्चित, सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात विश्वासू उमेदवार —
सतिश उर्फ नंदू गोविंदराव गोंदकर
यांच्या विजयानं प्रभाग २ ची दिशा बदलणार, असा ठाम विश्वास सुनिल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.


प्रभाग २ मध्ये आता एकच आवाज — “किटलीचा तडाखा… नंदूभाऊंचा झेंडा!”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button