Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

दहा रुपयाचा मोह ठरला ७९ हजार रुपयाच्या मोबाईल चोरी साठी कारण

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात चोरटे चोरी करताना विविध प्रकारची मोडस वापरताना दिसून येतात चोरी गेलेले मोबाईल सहसा सापडत नाही हा अनुभव जरी साईभक्तांना असला तरी काही साईभक्त साईदर्शनासाठी जाताना आपल्या वाहनाच्या चालकाकडे मोबाईलची पर्स घेऊन निघून जातात कधी काचा फोडून तर कधी दरवाजा उघडुन मोबाईल घेऊन पळून जाणारे चोरटे यापूर्वी शिर्डीत गुन्हा करताना दिसून आले होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आता मात्र मोबाईल चोरट्याने चोरी करताना नवीनच फंडा अवलंबल्यामुळे परराज्यातून आलेल्या साईभक्तांच्या कुटुंबातील सदस्यांचे ७९ हजार रुपये किमतीचे ४मोबाईल चार हजार रोख व ए टी एम क्रेडिट व डेबिट कार्ड चोरून नेण्याची घटना नुकतीच २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नगर मनमाड रोडवर घडली याबाबत अधिक माहिती अशी राजेश कुमार सिंग व ३९ धंदा ड्रायव्हर राहणार मनियारी तालुका सैदपूर जिल्हा गाझीपथ उत्तर प्रदेश

सध्या राहणार ठाणे हा विजय रॉय ह्या कुटुंबाला घेऊन एम एच ४३ बी एन, १००० या चारचाकी वाहनातून क्रिस्टा गाडीत प्रवास करत नाशिक येथील विविध ठिकाणी दर्शन करून शिर्डी येथे आले होते अकरा वाजेच्या सुमारास नगर मनमाड रोडवर साईभक्त चालकाला सोडून दर्शनासाठी गेले होते वाहतूक पोलीसांनी वाहन रोडवर लावु नका अशा सूचना देखील दोन वेळा दिल्या होत्या परंतु परतु त्या चालकाने या सुचनेकडे लक्ष दिले नाही गाडी रोडवर उभी केली होती

चालकाच्या पाठीमागील सिटवर मोबाईलची बॅग ठेवून गेले साईभक्त दर्शनासाठी गेले होते चालक दरवाजा बंद करून गाडीत बसलेला असताना त्याला गाडीच्या जवळ दहा रुपयांच्या चलणी काहीनोटा पडलेल्या गाडीतून दिसल्या त्या नोटा उचलण्याचा मोह या चालकांला झाला व चोरट्यांची मोडस यशस्वी ठरली दरवाजा उघडल्यानंतर नोटा गोळा करत असताना गाडीचा दुसऱा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने गाडीमध्ये पर्स मधील ७९ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल घेऊन अज्ञात छोटा पसार झाला

सदरचे साईभक्त साई दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांनी चालकाला त्याच्या मोबाईलवर फोन करून आमचे सर्वांचे मोबाईल घेऊन हॉटेल जवळ नाश्ता करण्यासाठी ये असे सांगितले असता त्याने मोबाईल चोरी गेले असे सांगितले त्यानंतर या साईभक्तांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये येऊन घडलेला प्रकार सांगितला चालक राजेश कुमार सिंग व ३९ रा ठाणे फिर्यादीवरून चार विविध कंपन्यांचे ७५ हजार रुपये किमतीचे मोबाईल चार हजार रुपये रोख विविध बँकेचे ए टी एम व डेबिट कार्ड असा ७९ हजाराचा ऐवज चोरी गेल्याची फिर्याद्

शिर्डी पोलिसात दिली शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वय चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button