Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरशिर्डी

श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी उतरला “डोक्यावरील गाठीचा डोंगर!”

अनिकेत भानुदास इंगळे, रा.चत्‍तरी ता-पातुर जि. अकोला येथील २१ वर्षीय तरुणाच्‍या डोक्‍यावर जन्मजात छोटी असलेली गाठ कालांतराने वाढत जावुन ४.९ किलो वजनाची झाली. डोक्‍यावर गाठीचा जणु डोंगरच झाला ही गाठ इतकी मोठी होती की ती दूरूनही सहज दिसत होती व रुग्णाच्या सामाजिक,मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अनेक वर्षांपासून या गाठीसह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून त्‍यांच्‍या जीवीत्‍वाला होणा-या संभाव्‍य धोका पाहुन कुठलेही डॉक्‍टर त्‍यांची शस्‍त्रक्रिया करणेस तयार नव्‍हते. यातुन माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्‍न रुग्‍णाला कायम सतावत होता यासाठी त्‍यांनी अनेक नामांकीत हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले. परंतु गाठ डोक्‍याला असल्‍याने जिवीत्‍वाची जबाबदारी कुणी घेणेस तयार नव्‍हते

शेवटी कंटाळुन त्‍यांनी साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे धाव घेतली. येथे हॉस्पिटलमध्‍ये आल्‍यानंतर डॉ.अजिंक्‍य पानगव्‍हाणे यांनी त्‍यांची संपुर्ण तपासणी करुन त्‍यांचेवर शस्‍त्रक्रिया करणेचा धाडसी निर्णय घेतला व रुग्‍णांने व त्‍यांच्‍या नातेवाईकांनी संभाव्‍य धोका पत्‍करुन ही सहमती दर्शवली.


दि.२५ जुन रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ निहार जोशी व त्यांच्या सर्जरी विभागाच्या टीमने प्रयत्‍नांची पराकाष्‍टा करुन रुग्‍णांचे जिवीत्‍वाला कोणताही धोका न होवु देता इतक्‍या मोठया प्रमाणात वाढलेली ३० x २.५ से.मी. आकाराची व तब्बल ४.९ किलो वजनाची भलीमोठी संपुर्ण गाठ एकाच वेळेस पुर्णपणे काढली.

अशा प्रकारची अवघड, गुंतागुंतीची व दुर्मिळ आजारावरची शस्‍त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये प्रथमच सर्व टीमच्‍या प्रयत्‍नानमुळे यशस्‍वी पार पाडली आहे असे डॉ.अजिंक्‍य पानगव्‍हाणे यांनी यावेळी बोलताना सांगीतले तसेच श्री साईबाबा हॉस्पिटल हे केवळ श्रद्धेचे नव्‍हे तर आरोग्‍य सेवेतही चमत्‍कार घडवणारे केंद्र ठरत असुन रुग्‍ण पुर्णपणे बरा होवुन सुखरुप पणे घरी पोहचला आहे.

यामुळे रुग्‍ण व त्‍यांचे कुंटुंबांच्‍या आनंदाला पारावार उरला नाही. ही संपुर्ण शस्‍त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलने पुर्णपणे मोफत केली असुन या यशस्‍वी शस्‍त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था,

शिर्डीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से) उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी, भिमराज दराडे, रुग्‍णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, न्‍युरो सर्जन, डॉ.मुकुंद चौधरी, जनसंपर्क अधिकारी, सुरेश टोलमारे आदीनी डॉ.अजिंक्‍य पानगव्‍हाणे व त्‍यांच्‍या संपुर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button