Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
अ.नगरराजकीय

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम

हिल्यानगर, दि. १२ : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ अर्थात ‘पॉश’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी केले आहे.

sai nirman
जाहिरात

‘पॉश’ कायद्यांतर्गत ज्या शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्या सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. महिला व बाल विकास विभागाच्या शासननिर्णयानुसार संबंधित संस्थांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून तिची नोंद ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर करणे आवश्यक आहे.

DN SPORTS

kamlakar

तसेच ज्या आस्थापनांमध्ये १० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत, त्या आस्थापनांसाठी तक्रार निवारणाच्या उद्देशाने जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ‘पॉश’ कायद्यातील कलम २५ नुसार शासन संबंधित आस्थापनांकडून माहिती मागवू शकते तसेच तपासणीही करू शकते.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात आली आहे का, तिची नोंद ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर करण्यात आली आहे का आणि समिती कायद्यानुसार कार्यरत आहे का, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. कायद्यातील कलम २६ नुसार अंतर्गत तक्रार समिती स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहितीही श्री. कदम यांनी दिली.

या अनुषंगाने दि. ११ जून २०२६ रोजी परिविक्षा अधिकारी योगिता जाधव, पीसीपीएनडीटी प्रकल्प अधिकारी अनिता मिसाळ तसेच डेटा एंट्री ऑपरेटर समीक्षा रावत यांनी एमआयडीसी परिसरातील मे. कमिन्स जनरेटर आणि मॅट्रिक्स इंजिनिअरिंग टेक या आस्थापनांना भेट देऊन तपासणी केली. यावेळी ‘आमी’ संघटीलाही भेट देण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष जयदत्त खानक यांना ‘पॉश’ कायद्यांतर्गत अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे, ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी करणे तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

संघटनेअंतर्गत सुमारे ४०० हून अधिक उद्योगांची नोंदणी असून, सर्व उद्योगांनी ‘पॉश’ कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button