Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवला धडा!

[14:32, 20/6/2026] ………..: साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही आता साखळीचोरांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर आले आहे. शिर्डीत भररस्त्यात एका वृद्ध भाविक महिलेच्या गळ्यातील तब्बल तीन लाख रुपयांच्या सोन्याच्या चेन हिसकावण्याचा थरारक प्रकार घडला असून, या घटनेमुळे साईनगरीतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिर्डी प्रतिनिधी : साईनगरीत साखळीचोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी कर्नाटकातून आलेल्या एका कुटुंबावर भररस्त्यात चोरट्यांनी हल्ला चढवत वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल ३० ग्रॅम सोन्याच्या दोन चेन लंपास करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत संबंधित महिला रस्त्यावर कोसळून जखमी झाल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ही धक्कादायक घटना १२ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेल साई स्मरण समोरील, मंदिर गेट क्रमांक २ कडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. हिमावंत पपुरी रेड्डी हे आपल्या कुटुंबासह साई दर्शन करून हॉटेलकडे पायी जात असताना चेहऱ्यावर कापड बांधून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले.
क्षणार्धात मागे बसलेल्या चोरट्याने वृद्ध सरस्वतम्मा रेड्डी यांच्या गळ्यातील सुमारे ३ लाख रुपयांच्या दोन सोन्याच्या चेन हिसकावल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सरस्वतम्मा रेड्डी या थेट डांबरी रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.


मात्र, फिर्यादी हिमावंत रेड्डी यांनी दाखविलेल्या धाडसामुळे एक चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यांनी चोरांच्या दुचाकीला लाथ मारताच मागे बसलेला चोर रस्त्यावर आदळून बेशुद्ध पडला. संतप्त नागरिकांनी आणि गस्तीवरील पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. उपचारानंतर त्याने आपले नाव बादल पंडित चव्हाण (रा. अशोकनगर, श्रीरामपूर) असल्याचे सांगितले.


दरम्यान, त्याचा साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत भरधाव वेगाने पसार झाला. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
साईनगरीत भाविकांवर सातत्याने होणाऱ्या साखळी चोरी, पाकिटमारी आणि लुटमारीच्या घटनांमुळे ‘भाविक सुरक्षित आहेत का?’ असा सवाल आता उपस्थित होत आहे. लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शिर्डीत भाविकांना लक्ष्य करून साखळी चोरी करणाऱ्या आरोपी बादल पंडित चव्हाण याचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास आहे का, याचा सखोल तपास पोलीसांनी करावा, अशी मागणी भाविक आणि नागरिकांमधून होत आहे. आरोपीने यापूर्वी शिर्डीसह जिल्ह्यात अथवा इतर ठिकाणी अशाच प्रकारचे साखळी चोरी, लूटमार किंवा भाविकांना लक्ष्य करणारे गुन्हे केले आहेत का, याची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच फरार साथीदारास तातडीने जेरबंद करून या टोळीमागील संपूर्ण रॅकेट उघड करण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button