Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

शिर्डीत मुलाकडून बापाची हत्या!शहरात परत एकदा मोठी खळबळ!पो.स्टे.ला गुन्हा दाखल!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीत मुलाकडून बापाची हत्या झाल्यामुळे परत एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
शिर्डी शहरात एक धक्कादायक घटना नुकतीच घडली असून मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाईपने जबर मारहाण केली.या मारहाणीत सधन कुटुंबातील 54 वर्षीय प्रतिष्ठित व व्यावसायिक दत्तात्रय शंकर गोंदकर यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातून हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट होताच, शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. दत्तात्रेय शंकरराव गोंदकर हे त्यांच्याच घरी त्यांची पत्नी संजीवनी गोंदकर हिच्याबरोबर काहीतरी कारणाने झटापट करत असताना मुलगा शुभम गोंदकर यांनी वडील दत्तात्रय गोंदकर यांना पाईपने मारहाण करत भिंतीवर ढकलून दिले .त्यात ते गंभीर जखमी झाले .त्यांना रुग्णालयात नेण्यात आले .मात्र तेथे दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाला . असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेत आरोपी मुलगा शुभम दत्तात्रय गोंदकर वय 29 राहणार हॉटेल साई शुभमच्या मागे ,शिवाजीनगर, शिर्डी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 (एक) याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दत्तात्रय गोंदकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही घटना 6 मार्च रोजी घडली होती, मात्र तब्बल पाच दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला. सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू म्हणून सादर करण्याचा प्रयत्न झाला, पण शवविच्छेदन अहवालाने हत्या झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेने शिर्डी शहर पुन्हा हादरले असून, शिर्डी पोलिस अधिक तपास करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button