Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
क्राईमशिर्डी

रणजित गलांडे अॅक्शन मोडमध्ये शिर्डी पोलिसांचा धडाका-बिअर शॉपसमोर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई

शिर्डी : शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांविरोधात शिर्डी पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून काल रात्री बिअर शॉपसमोर उभे राहून मद्यपान करणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे मद्यपींमध्ये एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही बिअर शॉपसमोर मद्यपान केल्यानंतर अनेकदा वाद, शिवीगाळ आणि मारामारी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दम भरला. तसेच बिअर शॉप चालकांनाही स्पष्ट शब्दांत ताकीद देण्यात आली की, दुकानासमोर अथवा परिसरात कोणालाही मद्यप्राशन करू देऊ नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button