Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरक्राईम

बापाने मुलगी ,जावई, नातवांनी मारहाण केल्याचा पोलीस स्टेशनला  केला गुन्हा दाखल!

कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे पालन पोषण व सांभाळ न करता तसेच शेतातील पाणी बंद‌ का केल्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केल्याने वडिलांनी आपली मुलगी, जावई नातू यांच्याविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील आनंदा दादा देवकर या वयोवृद्ध व्यक्तीने कोपरगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की,
मी तसेच पत्नी बबुबाई मुलगी जानका नातु योगेश व कुनाल असे एकत्र राहणेस असुन मी जेष्ठ नागरीक असल्याने माझा सांभाळ, पालन पोषन व दवाखान्याचा खर्च करावा यासाठी मी माझे दोन्ही मुली जानका, कांता यांचे नावावरती सव्वा सव्वा एकर जमीन बक्षीस पत्र म्हणुन नावावरती केली होती

परंतु माझी एकच मुलगी जानका ही माझे पानल पोषन करते. दुसरी मुलगी कांता शेजारीच राहणेस असुन ती माझेशी नेहमी भांडण करत असते.
दि.4/5/2025 रोजी दुपारी 2.00 वा चे सुमरास मी घरी असतांना ।) मुलगी कांता आनंदा देवकर, 2) जावई- दत्तात्रय जगन्नाथ काळे, 3) नातु संकेत रामदास काळे 4) नातु ओमकार दत्तात्रय काळे अशांना मी शेतातील पाणी का बंद केले याबाबत विचारणा केली असता

याचा त्यांना राग आल्याने त्यांनी मला विनाकारण शिवीगाळ करुन माझे कपडे फाडुन हाताचे चापटाने मारहान करुन तुला दाखवतो असे म्हणत धमकी दिली.अशी फिर्याद त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिली

असून कोपरगाव शहर पो.स्टेला 223/ 2025 नुसार ज्येष्ठ नागरिकांनी पालक यांचे 24 पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 कलम 115 (2) 3 (5) 351 (2) आदी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास कोपरगाव पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button