Letest News
राहाता पोलिसांची मोठी कारवाई-साकुरीतील क्लबवर छापा- रम्मी जुगार खेळताना तिघे रंगेहात ताब्यात गर्भलिंग रॅकेटमधील अनेक संशयित फरार-पोलिसांची मोठी धरपकड मोहीम सुरू राहुरीत दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई! शिर्डी-राहाता कनेक्शन उघड तीन आरोप... पेट्रोल-डिझेल संपणार? अफवांनी जिल्हा पेटला प्रशासनाचा सज्जड इशारा! शिर्डीत दोन्ही शिवसेना गट आमनेसामने-शिर्डीत तणावाचे वातावरण जागेच्या बांधावरून वाद- शेकडो तरुणांचा भ... “दोन मिनिटांत दर्शन”च्या आमिषाने साईभक्तांची लूट १९०० रुपयांचा हार विक्रीप्रकरण गाजलं! प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट! प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या आरोपीला जन्मठेप दसऱ्या लग्नाच्या तयारीतून पेटल... शिर्डीत पुन्हा चैन स्नॅचिंग-नूतन पोलीस अधीक्षकांनाही चोरट्यांची उघडी सलामी! कोट्यवधींचे CCTV-अनेक सु... राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ
राजकीयशिर्डी

पेट्रोल-डिझेल संपणार? अफवांनी जिल्हा पेटला प्रशासनाचा सज्जड इशारा!

हिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असतानाच जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्वतः पुढे येत अफवांना पूर्णविराम दिला आहे. “जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असा स्पष्ट आणि कडक इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. मात्र प्रशासनाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सांगितले की, “इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही. अफवांमुळे विनाकारण गर्दी करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.”
प्रशासनाने नागरिकांना ‘पॅनिक बायिंग’ टाळण्याचे आवाहन करत, आवश्यक तेवढेच इंधन घेण्याचे सांगितले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, सोशल मीडियावर अप्रमाणित संदेश फॉरवर्ड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, पेट्रोल पंप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर यांनीही नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button