Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

तिरुपती येथे दर्शन टोकन घेण्यासाठी उडाली धांदल! चंद्राचेंगरीत सहा जण ठार! काही जखमी!

तिरुपती-तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ गेटवर बुधवारी दर्शनासाठी टोकन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. तिरुपतीमधील विष्णू निवास आणि रामनायडू शाळेजवळ ही घटना घडली. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.
तिरुपती मंदिराच्या वैकुंठ गेटवर दर्शनासाठीचे टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती.

त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. तिरुमला तिरुपती देवस्थानने 9 डिसेंबरपासून दर्शनासाठी टोकन व्यवस्था सुरू केली आहे. तिरुपती मंदिराच्या 9 केंद्रांमध्ये 94 काउंटरद्वारे वैकुंठ दर्शन टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते टोकन घेण्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.


या चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले, काहीजण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिरुपती देवस्थान समितीने 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी वैकुंठ द्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी 1.20 लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता. असे समजते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button