Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगरशिर्डी

कोपरगाव प्रमाणे शिर्डी नगरपरिषदही शिर्डीतील हॉटेल साईस्पर्श मिनी पंजाब रेस्टोरंटचे अतिक्रमण काढण्याचे धाडस करणार का?

शिर्डी ( प्रतिनिधी) कोपरगावचे मुख्याधिकारी यांनी ठोस निर्णय घेऊन खाजगी जागेत बांधलेले अनधिकृत अतिक्रमित इमारतीतील मजला उध्वस्त केला. तसा निर्णय शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी घेणार का ?

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


  कोपरगाव मध्ये कोपरगाव नगरपरिषदेचे धडाकेबाज मुख्याधिकारी यांनी अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली आहे. कोपरगाव येथील खाजगी जागेत एका अनधिकृत असलेला इमारतीतील मजलाही त्यांनी काढला आहे. मात्र शिर्डीत गोरगरिबांची अतिक्रमणे घरे घरकुले टपऱ्या काढल्या जात आहेत  मात्र मोठ-मोठे हॉटेल, रेस्टॉरंट यांच्या इमारतीत अनधिकृत मजले‌ चढवण्यात आलेले आहेत.

हे अतिक्रमण मात्र नगरपरिषद काढण्यास दुर्लक्ष करीत आहेत. कारण ही अतिक्रमणे मोठमोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींची असल्यामुळे व त्यांचे वजन असल्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ते काढण्यास धाडस करीत नाहीत असे दिसून येत आहे. अनेकदा तक्रारी करूनही येथील हॉटेल साई स्पर्श मिनी पंजाब रेस्टोरंटचे अनधिकृत केलेले अतिक्रमण नगरपरिषदेने काढले नाहीत.

अशा अतिक्रमण धारक हॉटेलवाल्यांना नगरपरिषद एक प्रकारे आधार देत आहेत . त्यामागे काय गौड बंगाल आहे, हे समजत नसून कोपरगाव प्रमाणे शिर्डी नगर परिषदेने ही आता गोरगरिबांच्या झोपड्या टपऱ्या काढल्या तसेच   हॉटेल साई स्पर्श मिनी पंजाब रेस्टोरंटचे अनधिकृत केलेले अतिक्रमण नगरपरिषदेने काढावे अन्यथा तक्रार करणारे अर्जदार आमरण उपोषणाला ठाम आहे. 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button