Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
Blog

निळवंडे धरणातून पाणी आवर्तन सुरूच राहणार मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन! खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांचा प्रश्न लावला मार्ग!

शिर्डी (प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या व
गेली 53 वर्षे रखडलेल्या निळवंडे प्रकल्पातून दुसऱ्या चाचणीच्या निमित्ताने 14 ऑक्टोबर रोजी पाणी सोडले गेले होते. लाभक्षेत्रात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती खुपच गंभीर आहे. अशातच अजूनही टेलच्या भागात वितरिकांचे काम बाकी आहे, त्यामुळे बंधारे व पाझर तलाव भरून द्यावे अशी टेलच्या शेतकऱ्यांची मागणी होती.
मात्र प्रस्थापीत राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष व प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे पाणी 1 महिना सुरु असूनही व्यवस्थित नियोजन न झाल्यामुळे पाणी शेवटच्या व गरज असलेल्या लाभक्षेत्रात पोहचले नाही. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


याचीच दखल घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे बैठक घेतली होती तसेच चिंचोली गुरव येथे शेतकरी व जलसंपदा विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेत हा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता.दि. 13 नोव्हेंबर रोजी खा. सदाशिव लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेत, येथील परिस्थितीचे गांभीर्य सांगून पाणी वाढवून देण्याची मागणी केली. मा. मुख्यमंत्री यांनी याची तात्काळ दखल घेत संबंधित सचिव यांना त्वरित फोन द्वारे सुचना केल्या आहे. त्यामुळे पुढील काही दिवस निळवंडे धरणातून पाणी सुरूच राहून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच उपयोग होणार आहे.

kamlakar


गेली 5 दशके रखडलेला निळवंडे प्रकल्प खा. मा.सदाशिव लोखंडे साहेब यांनी मार्गी लावला. पाणी सुटल्यावर देखील आता अनेक प्रश्न निर्माण होत आहे पण ह्या प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे खा. लोखंडे साहेब असा ठाम विश्वास आता लाभधारक शेतकऱ्यांमध्ये झाला आहे.


पाणी वाढवून दिल्याबद्दल तमाम लाभधारक शेतकऱ्यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व खा. लोखंडे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद आहेत. असे अहमदनगर उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व निळवंडे पाट पाणी कृती समितीचे सचिव व शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button