Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
राजकीयशिर्डी

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नितेश कराळे सर यांनी शिर्डीत साई दरबारी येत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले

वर्धा येथील कराळे मास्तर आणि आपल्या अनोख्या भाषाशैली आधी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे आणि आता राजकीय लोकांना राजकारणाचे धडे देणारे तसेच अवघ्या महाराष्ट्राभर नुकत्याच सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवत प्रसंगी पोट धरून हसविनारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नितेश कराळे सर यांनी आज शिर्डीत साई दरबारी येत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा असल्याने सभा स्थळी जात असताना शिर्डीत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेत राज्यासह देशातील जनतेचे संकट दूर होऊदे आणि सर्वांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना बाबांकडे कराळे सरांनी केलीय.

kamlakar

तत्पूर्वी दुपारची मध्यांन आरती सुरु असल्याने अंगी साधेपणा असलेल्या कराळे मास्तरांनी थेट मुख दर्शन समोरील जमिनीवर बसत साईबाबांची आरती केली व आरती नंतर दर्शन घेत त्यानंतर सभास्थळी रवाना झाले.यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी व प्रहारचे शिर्डी शहरप्रमुख अमोल बनाईत,शिर्डी शहर काँग्रेसचे चंद्रभान पवार उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कराळे सर म्हणाले की राज्यासह देशात मोठी मोदी विरोधी लाट आली असून नगर दक्षिणेत देखील 40 ते 50 हजार मतांनी निलेश लंके निवडून येतील आणि शिर्डीत देखील महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल त्याचबरोबर आज शिर्डीत म्हणजेच फकिराच्या नगरीत आलो आहे मात्र “त्या फकिराने देश लुटला आणि ह्या फकिराने जनसामान्यांची सेवा केली” हा दोन्ही फकिरांमध्ये फरक असल्याची मिश्किल टीका केलीय

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button