Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
खेळशिर्डी

कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंदनाचा वर्षाव

शिर्डी : शिर्डी शहरातील कट्टर शिवसैनिक तसेच शिवसेना शिर्डी शहराचे उपशहरप्रमुख मा. नानक सावंत्र यांची अहिल्यानगर जिल्हा मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग) संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिर्डी शहरासह क्रीडा व राजकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अखिल महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मदन कोठुळे व सरचिटणीस मनोहर ताथवडकर यांच्या हस्ते नानक सावंत्र यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीद्वारे जिल्ह्यातील मुष्टीयुद्ध खेळाच्या विकासासाठी तसेच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


नानक सावंत्र हे सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला असून, आता क्रीडा क्षेत्रातही त्यांना मोठी जबाबदारी मिळाल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी आणि शिर्डीतील नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
💐 दैनिक साई दर्शन परिवार, शिर्डी यांच्या वतीने मा. नानक सावंत्र यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी कार्यासाठी शुभेच्छा!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button