Letest News
दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक
राजकीयशिर्डी

shirdinews#शिर्डीत मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा-70 डॉक्टरांचा उत्साही सहभाग

“स्नेहसंमेलन आपल्याला केवळ भूतकाळाची आठवण करून देत नाही, तर पुढील काळातही असेच एकत्र राहण्याची प्रेरणा देते. आपण समाजासाठी, देशासाठी आणि मानवतेसाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा संकल्प याच मंचावरून करूया,” असे मनोगत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


दरवर्षीप्रमाणे यंदाही दुसरे मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा Shirdi येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवसीय या कार्यक्रमात सन 1975 ते 1988 या कालावधीतील सुमारे 70 डॉक्टर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनाचे आयोजन डॉ. प्रकाश कोळपे यांच्या नियोजनातून आणि परिश्रमातून दिमाखात पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जे. डी. पाटील उपस्थित होते.

kamlakar


या वेळी डॉ. प्रकाश कोळपे, डॉ. राजेंद्र पिपाडा, डॉ. सुधीर गोडबोले, डॉ. अजित वहीकर, डॉ. राधा मॅडम, डॉ. मुकुंद भणगे, डॉ. गुंजाळ (कोळपेवाडी), सौ. डॉ. राजेश्री नवलाखे, डॉ. प्रल्हाद उडान, डॉ. रंगरेज, डॉ. अरुण निकम, डॉ. विजय सेनानी, डॉ. भुरे, डॉ. कैलास पाटील, डॉ. अवताडे, डॉ. रवींद्र पांडे, डॉ. लक्ष्मीकांत गोमटे आदींसह एकूण 70 डॉक्टर उपस्थित होते.
राजकीय क्षेत्रात पुढे जात डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर राज्यभर वेगळी ओळख निर्माण करून राजकीय पटलावर ठसा उमटवला आहे, असे मत माजी प्राचार्य डॉ. जे. डी. पाटील यांनी व्यक्त केले.


यावेळी डॉ. प्रकाश कोळपे यांनी गेल्या दहा वर्षांत उभारलेल्या शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील भव्य कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी आयुर्वेदिक कॉलेज, फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारून उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.


यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आपल्या भाषणातून जुन्या आठवणींना प्रेमळ उजाळा दिला. त्या आठवणींमुळे उपस्थितांच्या मनात भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. भूतकाळातील सहवास, मैत्री आणि अनुभव त्यांनी जिवंतपणे उलगडले, ज्यामुळे स्नेहसंमेलन अधिक आपुलकीचे आणि संस्मरणीय ठरले.


प्रमुख पाहुणे डॉ. जे. डी. पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला व सर्वांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. हा स्नेहमेळावा मागील वर्षी Jalna येथे आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी हा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील वर्षीचा मेळावा Nashik येथे घेण्याचे ठरले आहे.
शिर्डीत पार पडलेल्या या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून सर्वजण पुढील वर्षाच्या मेळाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button