Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

तलावात दोन संख्या बहिण भावाचा बुडून मृत्यू! परिसरात दुःख!

शिर्डी ( प्रतिनिधी)राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील भांबारे मळ्यातील साठवण तलाव निळवंडेच्या पाण्याने नुकताच भरला असून या तलावात 21 मे बुधवारी रोजी दुपारी 2 सख्ख्या बहिण भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मल्हारवाडी शिवारात राहत असलेल्या प्रशांत डोशी यांची मुले साहिल प्रशांत डोशी (वय 12, इयत्ता 6 वी) आणि दिव्या प्रशांत डोशी ( वय 15, इयत्ता 10 वी) ही निळवंडेच्या पाण्याने भरलेल्या साठवण तलावात पाणी पाहण्यासाठी गेले असता साहीलचा पाय घसरुन तो पाण्यात पडला.

पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागल्याने बहीण दिव्या हिने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तलावात पाण्याची खोली जास्त असल्याने दिव्याही पाण्यात बुडाली. दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना स्थानिक युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती मुलांचे वडील प्रशांत डोशी यांना दिली.

तोपर्यंत स्थानिक युवकांनी पाण्यात उड्या मारुन साहील व दिव्याचा शोध सुरु केला होता. स्थानिक युवकांनी या दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तात्काळ राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


दोन दिवसापूर्वी या परिसरात तलावात निळवंडे कॅनॉलचे पाणी सोडण्यात आले. परंतु या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेला या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. व दुःख व्यक्त होत आहे.

सध्या ग्रामीण भागात शाळांना सुट्टी आहेत. अनेक लहान मुले मामांच्या गावाला गेली आहेत. तसेच काही घरी आहेत. अनेक ठिकाणी शेततळे तलाव ओढे नाले आहेत. विहीरी आहेत. मुले सुट्टीमुळे खेळतात. बागडतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेततळे तलाव ओढे नाले आदी ठिकाणी मुलांना खेळण्यास प्रतिबंध करावा .पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे. धोक्याच्या ठिकाणी मुलांना मज्जाव करावा. असे आता नागरिकांकडून बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button