Letest News
शिर्डी नगरपरिषद निवडणूक 2025 — विखे घराण्याच्या रणनीतीबाबत चर्चांना उधाण! ६० टक्के नवीन चेहरे — नागर... प्रभाग क्रमांक २ मध्ये “अमृत गायके” यांच्या नावावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग ५ मध्ये “नितीनभाऊ शेजवळ” यांच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग क्रमांक १ मध्ये “संदीप भाऊ सोनवणे” यांच्या नावावर जनतेचा विश्व... प्रभाग क्रमांक २ मधून सौ. शोभाताई राजेंद्र कोते पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राहात्यात धाडसी चोरी! – पान दुकानाचे शटर फोडून दोन लाखांहून अधिक रक्कम लंपास इंजेक्शनकांड भाग–२ “सावळीविहीर येथील डॉक्टराची जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतली गंभीर दखल ? शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक १ मध्ये संदीप भाऊ सोनवणे यांच्या उमेदवारीची ज... आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी — निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या गाड्या आता रस्त्यावर — सुरक्षा धोक्यात!
क्राईमशिर्डी

तब्बल नऊ लाखांची चोरी गेलेली सोयाबिन पोलीसांनी मोठया शिताफीने चोरांसह घेतली ताब्यात

चोरीच्या सोयाबीनसह ३ चोराकडुन ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

sai nirman
जाहिरात

शिर्डी प्रतिनिधी / सावळीविहीर खुर्द ता राहता येथील संतोष भदे त्यांच्या घरासमोरून एक लाख ९ हजार रू. किमतीची २४ क्विंटल सोयाबीनच्या गोण्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने २०जानेवारी पहाटे चोरून नेल्याची फिर्याद संतोष भास्कर भदे यांनी शिर्डी पोलीसात दिली होती शिर्डी पोलीसांनी भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल
होताच तपास सुरू होताच पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोहेकॉ/विजय पवार, पोहेकॉ/अण्णासाहेब दातीर, पोहेकॉ/बाबासाहेब खेडकर, पोकॉ/सोमेश गरदास अशांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असता, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा १) अमोल वाल्मिक दंडवते २) अमोल रामदास आहेर दोन्ही रा. तीनचारी कोकमठाण ता. कोपरगाव ३) शुभम रमेश भालेराव रा. कोपरगाव यांनी केलेला असुन सदरचा चोरीस गेलेला माल श्रीकांत विलास चौरे, रा. खडकी ता. कोपरगाव याच्या टाटा आईस टेम्पो मध्ये भरून कोपरगाव कडुन येवल्याकडे घेऊन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पोलीस स्टाफसह कोपरगाव ते येवला जाणारे रोड वर श्रीदत्त मंदिरासमोर सापळा रचुन
थांबलेले असताना कोपरगाव कडुन एक क्रिम कलरचा टाटा आईस टेम्पो येताना दिसला त्यास थांबवुन त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव श्रीकांत विलास चौरे, रा. खडकी ता. कोपरगाव असे असल्याचे सांगितले. बातमीप्रमाणे खात्री झाल्याने सदर
चालकास टेम्पो मध्ये काय आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, १) अमोल वाल्मिक दंडवते २) अमोल रामदास आहेर दोन्ही रा. तीनचारी कोकमठाण ता. कोपरगाव 3) शुभम रमेश भालेराव रा. कोपरगाव यांची सोयाबीन विक्रीसाठी घेऊन चाललो आहे. ते कोठे आहे याबाबत विचारले असता तेही पाठीमागुन पांढ-या रंगाची इर्टिका कार मंधुन येत आहेत असे सांगितल्याने पाठीमागुन येणारी इर्टिका कार
थांबवुन त्यामधील इसमास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) अमोल वाल्मिक दंडवते २) अमोल रामदास आहेर दोन्ही रा. तीनचारी कोकमठाण ता. कोपरगाव असे असल्याचे सांगितले त्यावेळी शुभम रमेश भालेराव हा तेथुन पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या आरोपीतांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही सदरची सोयाबीन ही सावळीविहीर खु॥ ता. राहाता येथुन २० जानेवारी रोजी रात्री २ वाजता इर्टिका कारमध्ये गोण्या भरून चोरून आणली असुन ती विक्री करण्यासाठी टाटा आईस टेम्पो मध्ये भरून घेऊन चाललो होतो असे सांगितले. नमुद आरोपीच्या ताब्यात खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला आहे ९ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असता त्यांना राहता न्यायालयात हजर केले असता, मा.न्यायालयाने दिनांक २३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी संदीप मिटके याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, हे करीत आहे

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button