Letest News
२.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता शिर्डीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस-संस्थान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला-हरिभाऊ कोते यांचा इशारा ठरला खरा? शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी...
राजकीयशिर्डी

ब्रेकिंग : “निवडून येणारच कोण? जयश्री काकूंशिवाय आहेच कोण!” — शिर्डीत सर्वत्र एकच चर्चा

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता चित्र जवळपास स्पष्ट होत चालले असून, शिर्डी शहरात सध्या एकच चर्चा जोर धरू लागली आहे — “निवडून निवडून येणारच कोण, जयश्री काकूंशिवाय आहेच कोण!”
मतमोजणीच्या ताज्या फेऱ्यांनुसार जयश्री थोरात या तब्बल 5000 मतांच्या आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
धारधार : 5000 मतांची आघाडी; विरोधक गारद होण्याच्या मार्गावर
नगराध्यक्षपदाच्या लढतीत जयश्री थोरात यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतल्याचे चित्र समोर येत आहे. फेरीमागून फेरी त्यांची आघाडी वाढत चालली असून, 5000 मतांची निर्णायक आघाडी ही केवळ आकड्यांची नाही, तर जनतेच्या विश्वासाची स्पष्ट मोहोर मानली जात आहे. या आघाडीमुळे विरोधी गोटात अस्वस्थता आणि खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.
धारधार : चौकाचौकात, कट्ट्यावर एकच नाव — जयश्री थोरात
शिर्डीतील चौक, बाजारपेठा, चहाचे कट्टे आणि सोशल मीडियावर सध्या एकच नाव गाजत आहे — जयश्री थोरात.
“हा निकाल फक्त निवडणूक नाही, तर नेतृत्वावर टाकलेला विश्वास आहे,” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. महिला, युवक, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जयश्री थोरात यांच्या नावाला स्पष्ट पसंती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
ब्रेकिंग : अंतिम निकालाची औपचारिकता बाकी; शिर्डीला पहिली महिला नगराध्यक्षा?
मतमोजणी अद्याप अंतिम टप्प्यात असली तरी, जयश्री थोरात यांचा विजय आता केवळ औपचारिकतेवर आला आहे, अशी भावना शिर्डीकरांमध्ये व्यक्त होत आहे. अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर शिर्डी शहराला एक सक्षम, अनुभवी आणि जनतेच्या विश्वासावर निवडून आलेली नगराध्यक्षा मिळणार, अशी चर्चा जोर धरत आहे.
दरम्यान, प्रशासन हाय अलर्ट मोडवर असून, निकाल जाहीर होईपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button