Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
अ.नगरक्राईम

डॉक्टर मकासरे यांनी अतिकर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची प्रॉपर्टीची चौकशीची मागणी केली  

अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषनचे अतिकर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मालमत्तेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मकासरे यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले की, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे विरोधात अनेक राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी हप्ते घेण्याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांनी याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक या सर्वांकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या बद्दल तक्रारी केल्या असून याबाबत अनेक वृत्तपत्रातही बातम्या प्रसिद्द झाल्या आहेत सदर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची अहमदनगर येथे नेमणूक झाल्यापासून त्यांनी खरेदी केलेल्या त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे घेतलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी व्हावी तसेच त्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी व्हावी. तसेच ते वापरत असलेल्या मोबाईलचे कॉल, एसएमएस, व्हाट्सऍप कॉल व व्हाट्सऍप मेसेजेसची अहमदनगर येथील नेमणूकी पासून ते आजपर्यंतची सविस्तर माहिती घेवून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मकासरे यांनी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button