Letest News
लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी!
अ.नगरक्राईम

कामधंद्याच्या वादातून मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या- राहता शहरात खळबळ

राहता : शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, कामधंदा करत नसल्याबाबत वारंवार जाब विचारल्याच्या रागातून मुलाने आपल्या ६५ वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राहता परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत उत्तम लक्ष्मण खैरे (वय ६५, रा. घोलप मंगल कार्यालयाजवळ, राहता) हे आपल्या मुलगा सचिन उत्तम खैरे याला कामधंदा करत नसल्याबद्दल नेहमी विचारणा करत होते. “काम का करत नाहीस, पैसे का कमवत नाहीस” असा जाब ते वारंवार विचारत असल्याने आरोपीच्या मनात राग साचला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोरील अंगणात या वादाने उग्र रूप धारण केले. संतापाच्या भरात आरोपी सचिन खैरे याने आपल्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जवळच असलेल्या फरशीने डोक्यावर व शरीरावर गंभीर प्रहार केले. या भीषण मारहाणीत उत्तम खैरे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच राहता पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम १०३(१) व ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेतले आहे.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहता पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत्या करत आहेत.
दरम्यान, केवळ भविष्यासाठी काळजीपोटी कामाबाबत विचारणा करणाऱ्या वडिलांची मुलानेच हत्या केल्याने राहता शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button