Letest News
लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद
अ.नगरराजकीय

राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप)

राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप)

sai nirman
जाहिरात

राहाता – “निवडणूक आली की टोळ्या करून बाजार भरवतात, पाच वर्ष दिसतही नाहीत… जनतेच्या पैशावर डल्ला मारण्यासाठीच ही टोळी पुन्हा समोर येते आहे. पण या वेळेस जनता झाडू हातात घेऊन अशा भोंदू लोकांना हद्दपार करणारच!” — असे तीव्र आरोप आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, विधीज्ञ रामनाथ भाऊसाहेब सदाफळ यांनी केले.

🔴 पाच वर्ष बिळात – निवडणुकीत हॉटेल चिट्ठ्या!

DN SPORTS

सदाफळ म्हणाले, “येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणं तर दूरच… गावात कोणते प्रश्न आहेत याचा पत्ता नसतानाही आता ही मंडळी टोळ्या करून घराघरात फिरू लागली आहेत. तरुण पिढीला फसवण्यासाठी हॉटेल चिट्ठ्या, मटण–दारू देऊन मतं खरेदी करण्याचे घाणेरडे प्रकार सुरू झालेत. अशाने राहात्याचा विकास होणार नाही, तर फक्त नगरपरिषदेची तिजोरी लुटली जाणार!”

🔴 ‘ओबीसीच्या नावावर भावनिक शोषण’ — पण प्रत्यक्षात शोषण करणारे हेच!

सदाफळ पुढे म्हणाले, “आज हे लोक ओबीसीचा नारा देत निवडणूक रंगवू पाहतायत… पण हेच भांडवलदार वर्षानुवर्षे सर्वसामान्य ओबीसी बांधवांचे आर्थिक शोषण करीत आले आहेत. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त करणारे हेच लोक! स्वहितासाठी हे कोणत्याही थराला जातात.”

🔴 ‘करवाढ, दंड, पिळवणूक… सर्व प्रस्ताव यांच्याच सहीने!’

राहाता शहराला कष्ट देणारे सर्व निर्णयही याच गटाच्या नावावर टाकत सदाफळ म्हणाले—

kamlakar

नगरपरिषदेचा २४% करवाढ प्रस्ताव

त्यावर २% व्याज + दंड

नागरिकांवरील आर्थिक ताण
— हे सर्व निर्णय याच लोकांनी घेतले. आता तेच लोक मतांचा जोगवा मागत फिरतायत, हे लाजिरवाणं आहे!”

🔴 ‘गावाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराची दुर्गंधी’

सदाफळनी राहाता नगरपरिषद प्रशासनातील गंभीर अनियमितता उघडकीस आणताना सांगितले—

पाणी साठवण तलावातील भ्रष्टाचार

भुयारी गटार योजनांतील अनियमितता

निकृष्ट दर्जाचे रस्ते

पाणीपुरवठा योजनेतील लाखोंची लूट

स्वच्छता अभियानातील अनियमितता

कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण व मानसिक पिळवणूक

“या सर्व भ्रष्टाचाराचं मूळ एकच — जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याची लालसा!” असे सदाफळ यांनी ठणकावले.

🔴 ‘आम आदमीकडे येणाऱ्या तक्रारी म्हणजे जनतेचा उद्रेक!’

प्रभाग ८ चे डॉ. जयंतराव दामोधर गायकवाड, प्रभाग ५ चे महेश अरविंद भालेराव, प्रभाग ७ ची निता अमोल शहा आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामनाथ सदाफळ — हे सर्व उमेदवार जनसंपर्कात गुंतले असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि प्रश्न मांडले. सदाफळ म्हणाले,
“राहाता बदलाची मागणी करत आहे… आणि बदल म्हणजे आम आदमीची स्वच्छ राजकारणाची लाट!”

🔴 ‘जनता आता झाडू उगारून हद्दपार करणारच!’

शेवटी सदाफळ म्हणाले—
“राहात्याच्या जनतेने आता निर्णय घेतलाय. जनतेच्या तिजोरीत डल्ला मारणाऱ्या टोळीला झाडूने साफ करण्याचा क्षण जवळ आलाय. आम्ही लढतोय आम आदमीच्या हक्कासाठी, पारदर्शकतेसाठी, भ्रष्टाचारमुक्त राहात्यासाठी!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button