Letest News
दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ... शिर्डीचा लाडका भूमिपुत्र हरपला… साई भक्त उद्योजक जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अ... लिंगपिसाट कॅप्टनच्या “पत्नीच्या खात्यातून १७ कोटींचा स्फोट!” – कल्पना खरात रडारवर शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये  “RTO नेही तीच पिपाणी वाजवली – ‘मी नाही त्यातली!’आता ‘कडी लावा आतली’ची माग... पोलीस ठाण्यात ACB चा सापळा – 35 हजारांची लाच घेताना हवालदार रंगेहाथ पकडला! भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच? ‘भोंदू’ खरात प्रकरणाला नवा टर्न-पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर २२ तारखेला सुनावणी भोंदू खरात प्रकरणात मोठे मासे अडकणार? शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये लोंढेची तासाभरापासून कसून चौकशी सुरू! बोगस खात्यांचा स्फोट- अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांचा मोठा खुलासा “चाकणकरांचा स्फोटक आरोप-कोयटे पिता-पुत्रांचा बचाव – खोटं कोणाचं?”
राजकीयशिर्डी

साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या समकालीन भक्त कै. साईभक्त बायजा माँ आणि तात्या कोते पाटील यांच्या पवित्र परंपरेचा वारसा जपणारे, तसेच श्री साईबाबा संस्थानचे मानकरी आणि सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे सुस्वभावी व्यक्तिमत्व श्री. मिलिंद (दादा) कोते पाटील यांचा वाढदिवस आज भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साईसेवेची परंपरा, नम्र स्वभाव, सर्वांना आपलेसे करणारी वागणूक आणि सामाजिक बांधिलकी यामुळे दादा कोते पाटील हे शिर्डी परिसरात सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ठरले आहेत. साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे “सबका मालिक एक” हा संदेश आचरणातून जपणाऱ्या दादांनी श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे.


कोते पाटील कुटुंबाने साईबाबांच्या काळापासून जपलेली भक्तीची परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पुढे नेण्याचे कार्य दादा करत आहेत. समाजकार्य, धार्मिक उपक्रम आणि सर्वसामान्यांशी जुळलेली आपुलकी ही त्यांची खरी ओळख आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त साईभक्त, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून,
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड साईकृपा लाभो, हीच साईचरणी प्रार्थना.
🕉 साई राम 🙏🎂💐❤️

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button