Letest News
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464/- रुपय... पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ
क्राईम

८.७० लाखांचे गोवंश जप्त,दोन जणांवर गुन्हा

कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या नजीक टोल नाक्याजवळ कोपरगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार लावलेल्या सापळ्यात एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपणीचा इंट्रा व्ही-३० टेंपो (एम.एच.४३ बी.एक्स.८७८५) पोलिसांनी जप्त केला असून त्यातील विविध गोवंश जातीचे ८.७० लाख रुपयांचे गोमांस जप्त केले असून दोन आरोपी अटक केले आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाराष्ट्रात नऊ वर्षा पूर्वी भाजप सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍यात आला होता.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.तोपासून ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.गोहत्या करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शिक्षाही होण्याची तरतूद आहे.गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍याची मागणी सात‍त्याने होत होती.मात्र नऊ वर्षांनी आज चित्र पहिले तर हा कायदा खरेच उपयक्त ठरला का असा सवाल निर्माण झाला आहे.कारण अशा घटना वारंवार उघड होत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात उघड झाली असून यात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोकमठाण हद्दीत समृद्धी टोल नाक्याजनिक सापळा लावला असता त्या ठिकाणी वरील वर्णनाचा टेंपो पोलिसांना आढळून आला आहे.पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्यात ०२ लाख ७० हजार किमतीचे १७०० किलो ग्रॅम गोवंश जातीचे गोमांस,०६ लाख रुपये किमतीचा वरील वर्णनाचा टेंपो आढळून आला आहे.

kamlakar


दरम्यान यात दोन आरोपी मोहंमद कैफ शरीफ कुरेशी,(वय-२०)रा.कुर्ला पूर्व,रिजवान मलंग कुरेशी (वय-३६) उस्मान गल्ली कुर्ला पूर्व आदींना अटक केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२१३/२०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम १९७६ चे कलम ५,९,११ भा.द.वि.कलम १८८,२७९,२७१,३४,साथ रोग अधिनियम १८९७चे कलम ३,४ प्रमाणे २ आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.घटना स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस हे.कॉ.के.ए.जाधव हे करीत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button