Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात

शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन तर साईआश्रम भक्‍तनिवास प्र. अधिक्षक विजय वाणी व प्र. उप वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.

यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, साईआश्रम भक्‍तनिवास प्र. अधिक्षक विजय वाणी यांनी व्दितीय अध्याय,

उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी तृतीय अध्याय, प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी चौथा अध्याय व प्र. प्रशासकिय अधिकारी विश्‍वनाथ बजाज यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.
उत्सवाचे निमित्ताने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते. सकाळी ०९.०० ते ११.३० वा. श्री सुमित पोंदा, भोपाल यांचा

श्री साई अमृत कथा कार्यक्रम संपन्‍न झाला. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दु. ०१.३० ते ०३.३० वा. सक्‍सेना बंधु दिल्‍ली यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम संपन्‍न झाला. सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. संतोष तेलंग, बोरीवली यांचा कीर्तन कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्‍न होईल.

सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री विजय साखरकर, बोरीवली यांचा साईस्‍वर नृत्‍योत्‍सव हा कार्यक्रम असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. श्रींची शेजारती रात्रौ १०.०० वा. (पालखी मिरवणूक परत आल्‍यानंतर) होईल.

यादिवशी अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर व परिसरात केलेल्‍या आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्‍तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्‍या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्‍या पदयात्री भाविकांनी उत्‍सवात हजेरी लावली.


उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी गुरुवार १० जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन व सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा संपन्‍न होईल. सकाळी ०९.०० ते ११.३० यावेळेत श्री सुमित पोंदा, भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम होईल. तर, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होईल.

दुपारी ०१ ते ०३.०० यावेळेत श्री निरज शर्मा, नवी दिल्‍ली यांचा साई भजन कार्यक्रम, सायंकाळी ०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प.सौ. वेदश्री ओक, बोरीवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत मा. श्रीमती अनुराधा पौडवाल, मुंबई यांचा साई संध्‍याचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे.

उद्या गुरुवार असल्‍याने नित्‍याची चावडी पुजन होईल. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून, या दिवशी श्रींची शेजारती व शुक्रवार ११ जुलै रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button