Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत

शिर्डी, प्रतिनिधी :
श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागातील पहारेकरी राजेंद्र दोहाडे यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला आहे. मंगळवारी (दि. ४) समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात गस्तीदरम्यान त्यांना ₹३,४९० रोख रक्कम सापडली. त्यांनी कोणताही विलंब न करता ही रक्कम संरक्षण कार्यालयात जमा केली.
त्यानंतर संरक्षण विभागाने तत्काळ चौकशी करून संबंधित साईभक्त महिलेची ओळख पटविली. ही रक्कम सौ. Kasimi Kota Rama, रा. गुंटूर यांची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना ती सुरक्षितपणे परत करण्यात आली. हरवलेली रक्कम परत मिळाल्याने संबंधित भाविकांनी समाधान व्यक्त करत संस्थान प्रशासन आणि संरक्षण विभागाचे आभार मानले.
श्री साईबाबांच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचे दर्शन घडविल्याने संस्थानच्या सेवाभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. राजेंद्र दोहाडे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button