Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

“आणखी किती बळी गेल्यावर रस्ते होणार?” — शिर्डीत भाविकांचा जीव धोक्यात-पालकमंत्री विखेंना यांना थेट सवाल

शिर्डी — देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान. दररोज हजारो भाविक पायी दर्शनासाठी मंदिराकडे, रेल्वे स्टेशनकडे, बसस्थानकाकडे जात असतात. पण या पवित्र नगरीत आज भाविकांसमोर सर्वात मोठा धोका आहे तो खड्डेमय रस्ते आणि बेफाम वाहतूक यांचा. झालेला आहे 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


काल मिर्जापूर (उत्तरप्रदेश) येथील ४३ वर्षीय शैलेंद्र सिंह पटेल हे साईबाबांचे दर्शन घेऊन रेल्वे स्टेशनकडे पायी जात असताना भरधाव लक्झरी बसने पाठीमागून धडक दिली. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या जवळ साईप्रसाद, मोबाईल आणि प्रवासाची कागदपत्रे होती — श्रद्धेचा प्रवास मृत्यूने संपला.
हा अपघात केवळ योगायोग आहे का?
की ही वर्षानुवर्षे दुर्लक्षित केलेल्या समस्यांची परिणती?


रस्ते की मृत्यूचे सापळे?
शिर्डी शहरातील अनेक रस्ते खोल खड्ड्यांनी भरलेले आहेत. पावसाळ्यानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट होते. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फूटपाथ नाहीत. झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह फिके झालेले. सिग्नल यंत्रणा अपुरी.
खासगी ट्रॅव्हर्स, लक्झरी बसेस, तीनचाकी रिक्षा आणि दुचाकी वाहनचालकांकडून वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन होत आहे. उलट दिशेने धावणारी वाहने, चौकात होणारी कोंडी, आणि त्यात जीव मुठीत धरून चालणारे भाविक — हे चित्र रोजचे झाले आहे.


मंत्री महोदय, विकास नेमका कुठे?
पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री विखे  यांच्या कार्यक्षेत्रातच जर अशी अवस्था असेल, तर विकासाच्या घोषणा नेमक्या कुठे दिसतात?
शिर्डीसारख्या जागतिक तीर्थक्षेत्रात नगर मनमाड रस्ते दर्जेदार रस्ते का नाहीत?
भाविकांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग का उभारले गेले नाहीत?
भरधाव बसांवर कडक कारवाई का होत नाही?


अपघातानंतरच हालचाल का सुरू होते?
आणखी किती साईभक्तांचा बळी गेल्यावर रस्त्यांचे काम पूर्ण होणार?
हा सवाल आता संतप्त नागरिक उघडपणे विचारत आहेत.
अपघातानंतरची शोकांतिका
जखमी भाविक तडफडत असताना मदतीऐवजी मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्यांची गर्दी — ही समाजाची वेदनादायक बाजू. पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न म्हणजे, अशी परिस्थिती निर्माण होऊच कशी दिली जाते?


आता घोषणांपेक्षा कृती हवी
शिर्डीत येणारे सर्व मुख्य रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण व दुरुस्ती
पादचाऱ्यांसाठी संरक्षित कॉरिडॉर
लक्झरी बसांसाठी वेगमर्यादा व जीपीएस नियंत्रण
२४ तास वाहतूक गस्त व सीसीटीव्ही देखरेख
अपघातप्रवण ठिकाणांची स्वतंत्र ऑडिट


श्रद्धेच्या नगरीत येणाऱ्या भाविकांचा जीव सुरक्षित ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही — ती नैतिक बांधिलकी आहे.
साईबाबांच्या नगरीत भक्तांचा जीव जात असेल, तर ती केवळ दुर्घटना नाही — ती व्यवस्थेची चूक आहे.
मंत्री महोदय, जनता उत्तराची वाट पाहते आहे… आणि आता उत्तर घोषणांमध्ये नव्हे, तर रस्त्यांवर दिसले पाहिजे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button