Letest News
शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास
क्राईमशिर्डी

शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला

शिर्डी शहरातील श्रीरामनगर परिसरात १५ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम दशरथ हातांगळे (वय १५) याने ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी प्रेमच्या वडिलांचे निधन झाले होते. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या घटनेने हातांगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचा सर्व बाजूंनी तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने फोडलेला आक्रोश पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. श्रीरामनगर परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून नागरिकांकडून हातांगळे कुटुंबीयांप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button