Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
Blog

राहाता पंचक्रोशीतील परोपकारीव्यक्तिमत्त्व शाह मुश्ताकअली

राहाता : राहाता पंचक्रोशीतील
एक नवाजलेले व्यक्तीमत्व ज्येष्ठ
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते
गोरगरिबांच्या मदतीसाठी सातत्याने धावून येणारे परोपकारी व्यक्तीमत्व म्हणून ज्यांची ओळख असे शाह मुश्ताक अली जे मुश्ताक मामु/ मामा या नावाने सर्वांना सुपरिचित आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विविध ठिकाणी विविध मान्यवरांकडून
वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांचे अभिष्टचिंतन
करण्यात आले.
तसे त्यांचा वाढदिवस हा केवळ एकादिवसापूर्ता मर्यादित नसतो तर हा एकाप्रकारे वाढदिवस सप्ताह म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे सलग आठवडाभर विविध उपक्रमाद्वारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो.
शाह मुश्ताकअली यांचा
जीवन संघर्ष सांगायचा ठरल्यास एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन देखील त्यांनी अत्यंत कठीण
परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली आहे,
आर्थिक परिस्थिती जरी जेमतेम
असली तरी कोणाकडून कुठलाच
स्वार्थ न जोपासता त्यांनी नेहमी
निर्पेक्षतेने स्वतः ला सामाजिक कार्यात झोकून दिलेले आहे,
आज शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांनी आपल्या वयाचे ५७ वर्ष पुर्ण करुन ५८ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
पत्रकारीता क्षेत्रात देखील त्यांनी
आपल्या उतुंग कर्तबगारी ठसा
उमटविला असुन अनेक नवोदित
पत्रकारांना मार्गदर्शन करत पत्रकारीता क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून दिले असल्याने पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे मार्गदर्शन मोठ्या मोलाचे ठरत आहे.
त्यांच्या स्वतःचे साप्ता.भ्रष्टाचार
विरोधी जनआंदोलन या वर्तमानपत्राचे ते संस्थापक संपादक असून अनेक वर्तमानपत्र
संपादक वार्ताहरांचे मार्गदर्शक ते मार्गदर्शक आहेत.
जवळपास २० वर्षांपासून त्यांनी
पत्रकारीता क्षेत्रात आपली एक अनोखी ओळख निर्माण केली
असून पत्रकारीता क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही आपल्या उत्कृष्ठ कर्तबगारीचा ठसा उमटविला आहे.
पत्रकारीता क्षेत्रासह सामाजिक,शैक्षणिक
अध्यात्मिक, राजकीय, शासकीय,प्रशासकिय, निमशासकीय आदी क्षेत्रात
त्यांना माननारा मोठा वर्ग आहे, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे शाह मुश्ताकअली यांनी नेहमीच स्वतः ला समाज सेवेत
वाहून घेतले आहे, सामाजिक
कार्यात सर्वात अग्रस्थानी शाह मुश्ताकअली हे नाव जे पंचक्रोशीत गाजत आहे. त्यामागे आज शाह मुश्ताकअली यांचा फार मोठा त्याग आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button