मोफत उपचार असताना डॉक्टर पैसे मागतात ? काहींचे घेतले ? – वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नातेवाईकाची तक्रार

अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या नगरीतच काही कर्मचाऱ्यांना बाबांच्या शिकवणीचा विसर पडला की काय असे चिञ दिसून येतय..
श्री साईबाबा संस्थानचे दोनशे रुम साईनाथ हॉस्पिटल येथे मोफत उपचार होत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची प्रचंड मोठी संख्या आहे..
अशातच काही डॉक्टरांकडून रुग्णांना उपचार देताना पैशाची मागणी होत असल्याचा तसेच काहींनी पैसे दिल्याचा खळबळजनक आरोप काही नातेवाईकांनी केलाय.
याविषयी , वैद्यकीय संचालक डॉ प्रितम वडगावे वैद्यकीय उपसंचालिका मैथिली पिंताबरे यांच्याकडे संदिप गोतीस यांनी लेखी तक्रार दाखल केली असुन या आरोपात काय तथ्य समोर येते हे महत्त्वाचे ठरणार आहे..
दरम्यान याचवेळी दोन वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या नातेवाईकाच्या आँपरेशनसाठी ३२ हजार तर दुसऱ्याने साडेसहा हजार रुपये डॉक्टरांनी घेतले असल्याचा आरोप थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर केल्याने या गंभीर प्रकरणाची ८ दिवसांत योग्य चौकशी करुन काही तथ्य आढळल्यास कठोर कारवाई करु असे आश्वासन वैद्यकीय संचालक प्रितम वडगावे यांनी नातेवाईकांना दिले आहे..