Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
शिर्डी

साईभक्ताच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या साईबाबांना ४३लाखाचा सोन्याचा मुकुट दान

शिर्डी प्रतिनिधी/ भारतात बालाजी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व मोठा नावलौकिक असलेल्या व साईभक्त भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने ४३ लाख रुपये किंमतीचा साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सोनेरी मुकूटाची किंमत ४२ लाख ८० हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला आकर्षक व मनमोहक दिसणारा सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मुर्तीवर चढवण्यात आला. मुर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साईभक्‍ताने संस्थानला दान स्वरूपात दिला असून आपले नाव जाहीर न करण्याची विनंती करत हे गुप्त दान असल्याचे सांगितले आहे

दिवसेंदिवस दानराशी वाढत असताना सुवर्ण अलंकार दागदागिने हिरे हार मुकुट अशा प्रकारचे सुवर्ण अलंकार असलेले दागदागिने दान स्वरूपात येत असून यात अनेक दानशूर दान करताना दान गुप्त दान स्वरूपात दान देताना नाव गुप्त ठेवण्याची काळजी देखील साईभक्त घेत आहेत साईबाबा संस्थान येणाऱ्या दानातुन मोफत भोजनालय हजारो साईभक्त भाविकांना निवास सुविधा त्या बरोबरच शैक्षणिक सुविधा

तसेच हजारो रुग्णांना साईबाबा संस्थान व साईनाथ रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देत असुन वर्षाकाठी काही कोटी भाविक साईबाबा मंदिराला भेट देत असुन त्याच्या सेवेसाठी हजारो हात २४तास अविरत सेवा देण्यासाठी योगदान देत आहे त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष यार्लागड्डा जिल्हा अधिकारी सिध्दाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button