Letest News
“शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर... साकुरीतील ‘त्या’ क्लबचा पुन्हा स्फोट- राजकीय वरदहस्तामुळेच ‘त्या’ क्लबला अभय? नागरिकांमध्ये संताप राहाता पोलिसांची मोठी कारवाई-साकुरीतील क्लबवर छापा- रम्मी जुगार खेळताना तिघे रंगेहात ताब्यात
राजकीयशिर्डी

राहाता येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा वेगात-डॉ. राजेंद्र पिपाडा यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निधी मंजुरीची विनंती

राहाता : राहाता व परिसरातील नागरिक तसेच शिर्डीत येणाऱ्या हजारो भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राहाता येथे सर्व सुविधांनी युक्त उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने मान्यता व निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रस्तावित रुग्णालयात नागरिकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष (Help Desk) उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी सुलभ रॅम्प व लिफ्टसह प्रवेशव्यवस्था, पुरेशी वाहनतळ (पार्किंग) सुविधा, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रशस्त प्रतीक्षा कक्ष उभारण्यावरही भर देण्यात आला आहे.


डॉ. पिपाडा यांनी निवेदनात नमूद केले आहे की, राहाता तालुका व शिर्डी परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक व भाविकांची वर्दळ असते. आपत्कालीन परिस्थितीत तातडीची व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि जीविताचा धोका वाढतो.


उपजिल्हा रुग्णालय उभारल्यास स्थानिक नागरिकांना वेळेवर उपचार मिळतील, गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक आणि अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ मदत मिळेल तसेच मोठ्या शहरांवरील आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमी होईल.
या मागणीस शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button