Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा असून, श्रद्धेपोटी भाविक साईचरणी भरभरून दान अर्पण करत असतात. अशाच भक्तिभावाचे दर्शन नवी दिल्ली येथील साईभक्त श्री. सतीश कुमार चान्ना यांनी घडविले आहे.
श्री. चान्ना यांनी ७५ ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम केलेले आणि हिऱ्यांनी जडविलेले सोन्याचे ब्रोच श्री साईबाबांच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केले. या मौल्यवान ब्रोचची किंमत ११ लाख १९ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
साईभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेली ही अनमोल भेट श्री साईबाबांप्रती असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेचे प्रतीक ठरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

श्री साईबाबांच्या चरणी देश-विदेशातील भाविकांकडून विविध स्वरूपात दान अर्पण केले जात असून, भाविकांच्या श्रद्धेचा हा अखंड प्रवाह आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे.
दरम्यान, या उदार देणगीबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त श्री. सतीश कुमार चान्ना यांचा सत्कार करून त्यांच्या भक्तिभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“सबका मालिक एक” या साईबाबांच्या शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून साईचरणी अर्पण करण्यात आलेली ही मौल्यवान भेट भाविकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button