Letest News
शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ-
क्राईमशिर्डी

शिर्डीत भनसाळी टॉवर वरून पोलिसाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा केला प्रयत्न!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये एका पोलिसाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने हा पोलीस कर्मचारी वाचला असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी साईनाथ सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ही घटना शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी घडली आहे.
या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,शिर्डी पोलीस स्टेशनंचे तत्कालीन पोलीस नाईक गणेश वाळके यांनी आपल्या राहत्या घरी भन्साळी स्केयर, शिर्डी येथील इमारतीच्या तिसऱ्या माजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास श्री साईनाथ सुपर स्पेशलीस्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली असून ते सध्या स्टेबल असल्याचे समजते. तो सध्या संगमनेर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे मात्र समजू शकले नाही.


पोलीस नाईक वाळके हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा आहे. या घटनेचे वृत्त पोलीस दलामध्ये पसरतास मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button