Letest News
शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”
क्राईमशिर्डी

शिर्डीत पुन्हा चैन स्नॅचिंग_साई दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून ५.६० लाखांचे सोने लंपास

साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत येत असताना, कडक सुरक्षा व्यवस्था आणि सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चैन स्नॅचिंगचे प्रकार सुरूच असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज पहाटे शिर्डीत ५ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची गंभीर घटना घडली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याप्रकरणी धारवाड (कर्नाटक) येथील नविनकुमार निंगारेड्डी कोनारेड्डी (वय २८, व्यवसाय – सिव्हिल कॉन्ट्रक्टर) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते आपल्या आई-वडील व पत्नीसह दि. १४ जानेवारी रोजी शिर्डीत दाखल झाले होते व अलौकीक हॉटेलमध्ये मुक्कामास होते.


दि. १५ जानेवारी रोजी पहाटे सुमारे ५ वाजता साईबाबांच्या दर्शनासाठी निघाल्यानंतर सकाळी ६.४० वाजता दर्शन करून गेट क्रमांक दोनमधून बाहेर पडताना, श्रद्धा सबुरी पॅलेस हॉटेलसमोर पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आई प्रेमा निंगारेड्डी कोनारेड्डी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून पळ काढला.


चोरट्यांनी
▪️ १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (₹६०,०००)
▪️ ४० ग्रॅम वजनाची तीन पदरी सोन्याची चैन (₹२,००,०००)
▪️ ६० ग्रॅम वजनाचे मोठे मंगळसूत्र काळ्या मण्यांसह (₹३,००,०००)
असे एकूण ₹५,६०,००० किमतीचे दागिने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटना अत्यंत वर्दळीच्या परिसरात, मंदिराच्या अवघ्या काही अंतरावर घडली असून श्रद्धा सबुरी पॅलेस परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी राँग साईडने भरधाव पळ काढल्याने सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


इतकी व्यापक सुरक्षा व्यवस्था, सतत पेट्रोलिंग आणि शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चैन स्नॅचिंगचे प्रकार थांबत नसल्याने हे चोरटे थेट पोलिसांनाच आव्हान देत आहेत का? असा सवाल भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.


“चैन स्नॅचिंग प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास प्राधान्याने सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस सतर्क असून मंदिर परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.”
— अमोल भारती,
पोलीस उपविभागीय अधिकारी

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button