Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
राजकीयशिर्डी

गुरुपौर्णिमा उत्सवाची भक्तिमय सुरुवात; समाधी मंदिरात पाद्यपूजा-श्रींची प्रतिमा-पोथी व विणाची भव्य मिरवणूक

शिर्डी : प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ ची सुरुवात मंगळवारी अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात झाली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी समाधी मंदिरात श्री साईबाबांच्या पवित्र चरणांची विधिवत पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर श्रींची प्रतिमा, श्री साई सच्चरित्राची पोथी आणि विणाची पारंपरिक मिरवणूक साईनामाच्या अखंड जयघोषात व टाळ-मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्री साईबाबांच्या पवित्र चरणांची पाद्यपूजा संपन्न झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात आणि प्रभारी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यानंतर निघालेल्या पारंपरिक मिरवणुकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई सच्चरित्राची पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा, तर प्रभारी उपकार्यकारी अभियंता संजय जोरी आणि सीसीटीव्ही विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख राहुल गलांडे यांनी श्रींची पवित्र प्रतिमा खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.
साईनामाच्या अखंड जयघोषाने आणि भक्तिरसाने भारावलेल्या वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ तसेच देश-विदेशातून आलेले हजारो साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.


भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्याने गुरुपौर्णिमा उत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला. संपूर्ण शिर्डीनगरी साईमय वातावरणात न्हाऊन निघाली असून पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, पालखी सोहळे आणि आध्यात्मिक उपक्रमांमुळे साईभक्तीचा उत्सव अधिकच बहरणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button