Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईमशिर्डी

शिर्डीत पुन्हा गुन्हेगारीचा सुळसुळाट – दोन दिवसातच शांततेला धक्का-निवडणूक शांततेत पार पाडणाऱ्या पोलिसांनाही गुन्हेगारांची ‘सलामी’ ?

शिर्डी | दि. 3 डिसेंबर

sai nirman
जाहिरात

निवडणुकीला अवघे दोनच दिवस उलटले नाहीत तोच शिर्डीत पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कालिकानगर चौकात निर्घृणपणे तरुणाला मारहाण करून त्याची मोटारसायकल पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

DN SPORTS

kamlakar

👉

काय घडलं?

फिर्यादी रुपेश मोहीते (वय 25) यांना आरोपी कृष्णा पवार हा दारूच्या नशेत येऊन “ही जागा कोणाची आहे माहीत नाही का?” म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढ्यावर न थांबता फिर्यादीच्या स्प्लेंडर (MH-50-T-4750) या मोटारसायकलचे पेट्रोल टाकीचे झाकण काढून त्यात पेटती काडी टाकून थेट मोटारसायकल पेटवून दिली. अंदाजे 30,000 रुपये इतके नुकसान झाले.

गुन्हा क्रमांक 1014/2025 अन्वये BNS 2023 चे कलम 326(फ), 324(4), 115(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
प्रभारी अधिकारी तसेच दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र आरोपी फरार आहे.

🔥

“शिर्डीत गुन्हेगारी चालणार नाही!” – सुजय विखेंचा इशारा फोल?

डॉक्टर सुजय विखे यांनी निवडणूक प्रचारात स्पष्ट शब्दांत जाहीर केले होते की “शिर्डीत गुन्हेगारी अजिबात चालणार नाही. गुन्हेगारांनी सावध राहावे.”
पण अवघ्या दोन दिवसात गुन्हेगार पुन्हा उन्मत्तपणे फिरताना दिसत आहेत.

🔥

मंत्री राधाकृष्ण विखेंच्या वारंवार सूचना धाब्यावर?

राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनीदेखील अधिकाऱ्यांना गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर सूचना दिल्या होत्या. तरीही शिर्डीत गुन्हेगारी कमी होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.


😮

“पोलिसांना सलामीच्या भाषेत आव्हान?”

निवडणूक पूर्णतः शांततेत पार पडावी म्हणून पोलिसांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, कडक बंदोबस्त ठेवला. पण निवडणुकीनंतर लगेच अशा निर्भय पद्धतीने गुन्हा करून गुन्हेगारांनी जणू पोलिसांनाच सलामी दिली, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

❗

नागरिकांचा संताप – “शिर्डीत गुन्हेगारी खरंच थांबेल का?”

या घटनेनंतर नागरिक खुलेपणाने बोलू लागले आहेत —

👉

“शिर्डीत पुन्हा भयाचे वातावरण निर्माण होत आहे”

👉

“गुन्हेगारांवर कडक कारवाई न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल”

👉

“शिर्डी सुरक्षित शहर बनवणार कोण?”

🚨

पोलिसांनी तातडीने अटक मोहीम हाती घ्यावी

. नागरिकांनी पोलिसांकडून तातडीने

कालिका नगर मधील अनेक गुन्हेगार राजसोसपणे फिरत आहेत त्या गुन्हगारांना पकडणे

परिसरात कडक गस्त लावून कालिका नगर बाजारतळ जवळील चौकीत पोलिसांची कायम नेमणूक करणे 

अशा घटनांवर कठोर कारवाई झाली तर पुन्हा असे गुन्हे करण्यास गुन्हेगार घाबरतील 
या मागण्या कालिका नगर सौंदळीं आणि बाज़ारतळ येथील नागरिकांनी सुरू केल्या आहेत.

शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली जाणार? नागरिक आता कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button