Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
राजकीय

देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांकाची संकल्पना अनुकरणीय- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी

अहमदनगर दि. ३० एप्रिल :- मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण स्वीप उपक्रम राज्यात चालू आहेत.यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मदत होणार आहे.सक्षम लोकशाही समृद्ध करण्याकरिता प्रत्येक मतदाराने महत्त्वाचे योगदान देणे गरजेचे आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

याकरिता “एक जिल्हा – एक व्हाट्सअप नंबर ” या संकल्पनेवर आधारित अहमदनगर जिल्हास्वीप समितीचा देशातला पहिला स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांकाचा प्रयोग हा इतरांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे.यामुळे स्वीप उपक्रमांचे संकलन सुलभ व सोपे होणार आहे व संपर्क साधण्यासाठी हा प्रयोग फार महत्त्वाचा आहे ” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केले.

        जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,अहमदनगर सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार वैशिष्ट्यपर्ण स्वीप उपक्रम जिल्ह्यात वेग घेत आहेत.भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,पुणे येथे संपन्न झालेल्या स्वीप नोडल अधिकारी राज्यस्तरीय परिषद व प्रशिक्षण कार्यशाळेत अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या 9002109003 या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक उपक्रमाच्या विमोचनप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. 

        यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आराधना शर्मा -वरिष्ठ सल्लागार -स्वीप, शरद दळवी -उप मुख्य निवडणूक अधिकारी, -जिल्हा अशोक कडूस-(स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी,अहमदनगर) डॉ अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) आदी उपस्थित होते.

        संपूर्ण जिल्हाभरातील विविध प्रकारचे हजारो स्वीप उपक्रमांचे फोटो , कागदपत्रे ,वृत्तपत्र कात्रणे,पीडीएफ डॉक्युमेंट्स , ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स, जिंगल्स,रिंगटोन एकाच ठिकाणी संकलित होऊन या साहित्याचा जिल्ह्याच्या सोशल मीडिया व्यासपीठावर प्रसारित करण्यासाठी तसेच भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र यांना उपक्रम अहवाल  पाठवण्यासाठी या संकल्पनेचे उपयोजन होईल. म्हणून हा क्रमांक व या क्रमांकाचा क्यू आर कोड स्वीप समितीच्या सर्व प्रकारच्या मतदार जनजागृती प्रचार साहित्यावर वापरण्यात आलेला आहे,असे प्रतिपादन अशोक कडूस यांनी केले. सुमारे ३५ जिल्ह्यांमधून अहमदनगर जिल्ह्याला आपले स्वीप उपक्रम मांडण्याची संधी या कार्यशाळेत मिळाली.

उपक्रमासाठी राहुल पाटील( उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ),मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),आकाश दरेकर(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक),बाळासाहेब बुगे(उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) व सर्व स्वीप समिती सदस्यआदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button