Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट कडून विविध कार्यक्रमाचे आयोजन 

श्री. बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्टकडून डि.एम. चौधरींना समाजरत्न घोषीत राहाता (प्रतिनिधी) राहाता येथील वै.ह.भ.प.सजन यशवंत सदाफळ, वै. भाऊसाहेब सजन सदाफळ यांचे स्मरणार्थ जगदगुरु संत तुकाराम बिज महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ मार्च २०२५ रोजी राहाता येथील १५ चारी उपनगर येथे आयोजन करण्यात आलेले असुन दरम्यान बिज किर्तन सेवा भागवत कथाकार विकास महाराज गायकवाड यांचे सकाळी १० ते१२ या वेळेत जगदगुरु तुकाराम महाराजांचे जिवन चरित्रावर किर्तन सेवा होणार आहे. तदनंतर बाल कन्या संस्कृती सदाफळ हिचे संत तुकारामाचे जिवनपटावर माहिती सादर करणार आहे. तदनंतर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांचे हस्ते गोगलगांव येथील डि.एम. चौधरी, सेवा निवृत्त वरिष्ठ शाखा धिकारी बँक ऑफ बडोदा, सिईओ गौतम बँक यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी ट्रस्ट च्या वतीने उपस्थित भाविकांना श्रीमद् भगवत गिता भेट देण्यात येणार असल्याचे मार्गदर्शक बाळासाहेब गुळवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दरवर्षी ट्रस्ट कडून देण्यात येणारा हा पुरस्कार यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरींसाठी अनेक ग्रामिण भागात शाखा स्थापम करणारे डि.एम चौधरी यांना देण्यात आला आहे. त्यांनी त्याकाळी विविध समस्यांना सामोरे जात कठीण परिस्थीतीतुन समाजाची मदत मिळवुन शिक्षण घेतले. म्हणूनच त्यांनी समाजासाठी व ग्रामिण भागातील शेतकरी, यांच्या साठी बँकीग क्षेत्रात विषेश काम केल्याने भावी पिढीस त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष – अॅड. रामनाथ सदाफळ यांनी सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button