Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरशिर्डी

शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी मंदिरे साई संस्थानने पूर्ववत शिर्डी ग्रामस्थांकडे वर्ग करावीत– ग्रामस्थ

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारे मंदिरे ग्रामस्‍थांकडे साई संस्थांनने वर्ग करावेत. अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली आहे.व
10 फेब्रुवारी 2025 रोजी शिर्डी येथे ग्रामसभा राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी या ग्रामसभेत माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी तसा ठराव मांडला होता व त्यास माजी नगराध्यक्ष शिवाजी अमृतराव गोंदकर यांनी अनुमोदन दिले होते.
यावेळी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. त्या अनुषंगाने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समस्त ग्रामस्थांच्या वतीने तसे पत्र देण्यात येऊन मागणी करण्यात आली आहे .

त्यात म्हटले आहे की,पुर्वी ग्रामपंचायत हद्दीत असलेले व आजरोजी शिर्डी शहरातील श्री गणपती मंदिर, श्री शनि महाराज मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री हनुमान मंदिर हे शिर्डी ग्रामस्‍थांची पारंपारीक ग्रामदैवत आहेत. मात्र सदर ग्रामदैवतांची दैनंदिन पुजा-अर्चा व देखभाल ही ग्रामस्‍थांना करणे शक्‍य नसलेने सदरची ग्रामदैवते ही आम्‍ही ग्रामस्‍थांनी श्री साईबाबा संस्‍थानकडे दैनंदिन पुजा-अर्चा व देखभाल करणेसाठी दिलेली होती.


आम्‍ही शिर्डी ग्रामस्‍थ यांनी दि.10/02/2025 रोजी सभापती, कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, राहाता तथा माजी उपनगराध्‍यक्ष, शिर्डी नगरपरिषद श्री ज्ञानेश्‍वर गंगाधर गोंदकर, यांचे अध्‍यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन विविध विषयावर चर्चा करुन एकमताने सर्व विषय मंजूर केले आहे.

त्‍यावेळेस संस्‍थान प्रतिनिधी व इतर शासकीय विभागांचे अधिकारी देखील हजर होते. सदर ग्रामसभेत शिर्डी ग्रामदैवत श्री गणपती मंदिर, श्री शनी महाराज मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री महालक्ष्‍मी मंदिर, श्री खंडोबा मंदिर व अन्‍य छोटे मोठे मंदिर यांचा मा.धर्मादाय आयुक्‍त, अहिल्‍यानगर यांचेकडे नोंदणीकृत न्‍यास करुन त्‍याद्वारे मंदिराचे देखभाल दुरुस्‍ती व व्‍यवस्‍थापन पहावे असे सदर ग्रामसभेत ठरलेले आहे.

सदर मंदिरातून येणा-या देणग्‍या या धर्मादाय आयुक्‍त, अहिल्‍यानगर यांच्‍या देखरेखीखाली सदर मंदिरांचा विकास व सार्वजनिक उत्‍सव, सण साजरे करण्‍यासाठी तसेच शिर्डीतील अन्‍य विकासासाठी वापरणार आहोत. शिर्डीच्‍या ग्रामस्‍थांची ग्रामदैवते ही ग्रामस्‍थांचेच स्‍वतंत्र ट्रस्‍ट बनवून गावाची ग्रामदैवते हे ग्रामस्‍थानींच सांभाळावेत अशी यामागील शिर्डीकरांची भावना आहे. शिर्डीमध्‍ये होत असलेल्‍या अप्रिय घटना व ग्रामदैवतांची योग्‍य देखभाल,

पुजा-अर्चा होत नसलेने सदर निर्णय ग्रामस्‍थांनी घेतलेला आहे. उपरोक्‍त पार्श्‍वभुमीवर आजरोजी श्री साईबाबा संस्‍थानकडे उपरोक्‍त मंदिरांपैकी श्री गणपती मंदिर, श्री शनी महाराज मंदिर, श्री महादेव मंदिर व श्री हनुमान मंदिर यांचा दैनंदिन कारभार बघीतला जातो. तरी, नमूद चारही मंदिरे शिर्डी ग्रामस्‍थांकडे पुर्वीप्रमाणेच वर्ग करुन देण्‍यात यावीत. अशी मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button