Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
क्राईमशिर्डी

पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी दिली सलामी
चक्क ए टी एम फोडून लाखो रुपये केले लंपास
शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

कोपरगाव प्रतिनिधि
चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले होते. राजकीय नेते आणि पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. त्यामुळे चोरट्यांवर पोलिसांचा आणि पोलिसांवर नेत्यांचा धाक राहिलेला दिसत नाही असा आरोप नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.अनेक चोऱ्या होऊनही अद्याप या चोरट्यांचा तपास
लागलेला नाही.रोज होणाऱ्या दुचाकी चोऱ्याची तर मोजदाद नाही.त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. अशीच मोठी घटना
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे व शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २६ मे च्या रात्री घडली होती.तेथे सहकारी सेवा
सोसायटीच्या मालकीच्या ‘हिमगिरी’ या इमारतीत इंडियन ओव्हरसिज बँक असून सदर बँक हि ऐन गावाच्या मध्यवर्ती व रस्त्याच्या कडेला आहे.तरीही त्या रात्री ३.१५ वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी आपल्या तोंडावर मुखपट्ट्या बांधून ए.टी.एम. फोडता येत नाही हे पाहून आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप या चारचाकीचा वापर
करून एका वायर रोपच्या सहाय्याने सदर ए.टी.एम. ओढून बाहेर काढले व त्यास फरफट नेऊन गावाच्या पश्चिमेस साधारण तीन कि.मी. अंतरावर असलेल्या गोदावरी कालव्याच्या कडेला चौकीजवळ असललेल्या काटवणात लपवून ठेवले होते. त्याला सात महिने उलटत आले असताना त्यांच्या डोक्यातून या बँकेचे ए.टी.एम. बाहेर पडले
असल्याचे दिसले नाही. त्यांनी त्यावर पुन्हा एकदा पाळत ठेऊन काल रात्री म्हणजेच दि.१९ डिसेंबरच्या पहाटे ३.४७ वाजता सदर बँकेच्या ए.टी.एम.गाळ्यात प्रवेशकरून तेथील ए.टी.एम.गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यातील ५००,२००,१०० रुपये दराच्या नोटांची रोख रक्कम रुपये १० लाख ८३ हजार ७०० रुपयांवर डल्ला मारला
आहे. त्यामुळे अपुरी असलेली आपली मोहीम पोलिसांच्या नाकावर टिच्चून पूर्ण केली असल्याची जोरदार चर्चा शिर्डी, कोपरगाव राहाता तालुक्यात पसरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button