Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
Blog

ते घरी येतील तेव्हाच आमची दिवाळी”, जरांगेंच्या पत्नीचा निर्धार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी कंबर कसली असून आरक्षण मिळत नाही तोवर शांत न बसण्याचा त्यांनी निर्धारच केला आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची रणनीती आखली आहे. सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून तोपर्यंत त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निश्चय केलाय. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील दिवाळी साजरी करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, त्यांच्या घरातही दिवाळीची रोषणाई झाली नसल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी म्हणाल्या की, मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, त्यासाठी त्यांचा अभिमान आहे. आम्ही दिवाळी साजरी केली नाही आणि करणारही नाही. ते २४ डिसेंबरला घरी येतील तेव्हाच दिवाळी साजरी करणार. ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.तसंच, “सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, म्हणजे ते लवकर घरी येतील आणि २४ डिसेंबरला आम्ही दिवाळी साजरी करू.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button