Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचार करणार!

राहाता: परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि ध्येय समोर असेल तर यशाची शिखरे गाठता येतात, हे राहाता येथील साहिल शकील इनामदार याने सिद्ध करून दाखविले आहे. पंक्चर काढण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे वडील आणि कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही साहिलने गुणवत्तेच्या जोरावर नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS प्रवेश मिळविला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साहिलने NEET परीक्षेत ५३० गुण मिळवत सुमारे चार हजार क्रमांकाची रँक मिळविली. परिस्थितीशी दोन हात करत त्याने सातत्याने अभ्यास केला आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.
“एमबीबीएस होणे हे माझे स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे. आई-वडिलांचे कष्ट मी पाहत आलो आहे. मला घडविण्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. भविष्यात डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याबरोबरच त्यांच्या कष्टांचे पांग फेडणार आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया साहिल इनामदार याने व्यक्त केली.
साहिलच्या या यशाबद्दल राहाता शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार मुस्ताक शाह, इलियास शाह, खलील शाह, मतीन शेख, अलीम शाह, आतिक शाह, जमील शाह, आरिफ सय्यद, अन्वर सय्यद, साहिलचे वडील शकील इनामदार, चुलते राजू इनामदार, मौलाना अकील, मौलाना अल्ताफ हाफीज आदी उपस्थित होते.


“आई-वडिलांनी नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणाचे संस्कार दिले”
गटनेते मुन्नाभाई शाह म्हणाले, “साहिलला त्याच्या आई-वडिलांनी नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणाचे संस्कार दिले आहेत. डोळ्यासमोर ध्येय ठेवून तो वाटचाल करीत आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या या मुलाने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.”
पंक्चरच्या दुकानापासून वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतचा साहिलचा हा प्रवास केवळ एका कुटुंबाचा आनंद नाही, तर परिस्थितीशी संघर्ष करून स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेची नवी कहाणी ठरली आहे.

नगरसेवक मुन्नाभाई शाह व समाजबांधवांकडून साहिलचा सन्मान
साहिलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नगरसेवक मुन्नाभाई शाह आरिफ शेख इलियास भाई शहा पत्रकार मुश्ताक भाई शहा यांच्या पुढाकारातून मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने साहिल इनामदार याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. साहिलच्या यशाचे कौतुक करत त्याच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे उपस्थितांनी विशेष अभिनंदन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button