Letest News
नियोजित शिर्डी-नाशिक रेल्वेमार्गासाठी निमगाव-कोऱ्हाळे परिसरातील जमिनी जाणार शेतकऱ्यांनी वेळीच हरकती ... “मराठ्यांना मूर्खात काढू नका!” जरांगेंचा विखेंवर थेट बॉम्बगोळा—‘सगळ्यात चालबाज डाव तुमचाच दिसतोय!’ स्मशानभूमीच्या पाठीमागे रंगला ‘तिरट’चा डाव शिर्डी पोलिसांची धडक कारवाई ७ जुगारी ताब्यात शिर्डीत नोकरीला असलेल्या डॉक्टरच्या भरधाव फॉर्च्युनरची धडक निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू! बिर्याणीत गुटखा सापडला तर हॉटेल सील… मग जेवणात झुरळ सापडूनही चिन्नाराव हॉटेलला अभय का? दोन दिवसांत न... राहाता पोलिसांची वाळूचोरांवर कारवाई १५ लाखांच्या डंपरसह आरोपी ताब्यात पेढ्यांनी दिला धक्का-पॅकिंगवर विश्वास ठेवायचा तरी कसा? डीमार्टमधून घेतलेले पेढे बुरशीयुक्त शिर्डी–अहिल्यानगर रस्त्यावरून राजेंद्र पिपाडा यांचा संताप ‘जनतेने तक्रारी करायच्या नाहीत तर कोण करणा... “साईबाबांची पालखी समोर असताना कुठल्याही संकटाची भीती नाही!” — निस्सीम साईभक्त विजयभाऊ कोते साईनामाच्या जयघोषात अयोध्येत दाखल झाली साईबाबांची पालखी! दीड हजार साईभक्तांनी घेतले रामलल्लाचे दर्शन
अ.नगरराजकीय

kopargaon news: विवेक कोल्हे ‘तुतारी’ फुंकण्याचे संकेत

Vivek Kolhe signaled to blow the 'trumpet'

कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे. ते महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगावसह अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहेत. आता विवेक कोल्हे खरंच महाविकास आघाडीत जाणार का? जाणार तर कोणत्या पक्षात प्रवेश करणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

परंतु आज विवेक कोल्हे पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोपरगावात भाजपला धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

kamlakar

विवेक कोल्हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. शरद पवारांनी विवेक कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिल्याने आज व्हीएसआयच्या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची भेट होणार आहे.

त्यामध्ये राजकीय चर्चा होण्याची देखील शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे अजित पवारांसोबत गेले. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही सध्या महायुतीसोबत आहेत.

महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असे काळेंनी अनेकदा बोलून दाखवले. त्यामुळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आज विवेक कोल्हे शरद पवारांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button