Letest News
🚨 ब्रेकिंग न्यूज | शिर्डीत पेरू विक्रेत्यांचा अचानक रास्तारोको-वाहतुक ठप्प 🚨 सुसाईड नोटमध्ये नाव- FIR मध्येही उल्लेख-तरी चार्जशीटमधून ‘अशोक खरात’ गायब — नेमकं चाललंय काय? EXCLUSIVE: ‘कॅप्टन खरात’चा प्रभाव की संगनमत? साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे मोठा कट असल्या... कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई
राजकीयशिर्डी

१३ जानेवारीपूर्वीच राजकीय धडधड!उपनगराध्यक्षपदासाठी ‘ढाण्या वाघ’ नंदूभाऊ गोंदकर आघाडीवर

जिल्ह्यातील शिर्डी, राहाता, राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिकांच्या पहिल्या सर्वसाधारण सभा १३ जानेवारी रोजी होत असतानाच, उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून विविध गटांच्या बैठका, हालचाली व गुप्त चर्चांमुळे वातावरण तापले असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ढाण्यावाघ सतीश ऊर्फ नंदूभाऊ गोंदकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
मागील निवडणुकांचा संदर्भ महत्त्वाचा
मागील कार्यकाळात अपक्ष म्हणून निवडून आलेले सुजित गोंदकर यांना तत्कालीन राजकीय समीकरणांनुसार विखे गटाच्या पाठिंब्याने उपनगराध्यक्षपद देण्यात आले होते. त्या निर्णयामुळे पालिकेतील सत्तासंतुलन राखले गेले होते. त्याच राजकीय पॅटर्नचा आधार घेत यंदाही त्याच गटातील ढाण्यावाघ सतीश ऊर्फ नंदूभाऊ गोंदकर या विश्वासार्ह चेहऱ्याला संधी देण्याचे संकेत मिळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘ढाण्या वाघ’ म्हणून ओळख; संघटन कौशल्याचा फायदा
सतीश ऊर्फ नंदू गोंदकर यांची ओळख स्थानिक राजकारणात आक्रमक, संघटनक्षम व निर्णयक्षम नेता अशी आहे. ‘ढाण्या वाघ’ म्हणून ओळख असलेल्या ढाण्यावाघ सतीश ऊर्फ नंदूभाऊ गोंदकर   यांनी निवडणूक काळात केलेली सक्रिय भूमिका, कार्यकर्त्यांवरील पकड आणि नेतृत्वगुण यामुळे त्यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी पुढे आले असल्याचे बोलले जात आहे.
नगराध्यक्षांसोबत सुसंवाद हाच निर्णायक घटक
सूत्रांच्या माहितीनुसार, नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्षांसोबत समन्वयाने काम करण्याची क्षमता हाच यावेळी उपनगराध्यक्ष निवडीचा मुख्य निकष मानला जात आहे. या निकषावर ढाण्यावाघ सतीश ऊर्फ नंदूभाऊ गोंदकर   यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून, बहुसंख्य नगरसेवकांचा पाठिंबा त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तरीही शेवटचा निर्णय सभेतच
राजकीय हालचाली जरी वेगात असल्या, तरी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा ही १३ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेतच होणार आहे. तोपर्यंत विविध गटांकडून डावपेच, भेटीगाठी व मतांची जुळवाजुळव सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे.
पहिल्या सभेकडे नागरिकांचे लक्ष
पहिल्याच सर्वसाधारण सभेत होणाऱ्या या निवडींमुळे नगरपालिकेतील आगामी सत्तासमीकरण, विकासकामांची दिशा आणि राजकीय संतुलन ठरणार असल्याने, नागरिकांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button