Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
Blog

साईभक्ताच्या बॅगेमधून वीस हजार रुपयांचा मोबाईल व दहा‌हजार रुपये रोख रक्कम अनोळखी महिलेने पळवले!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथून एका साईभक्ताच्या बॅगेत असणारे वीस हजार रुपये किमंतीचा मोबाईल व दहा हजार रुपये रोख रक्कम एका अनोळखी महिलेने साई भोजनालयाच्या जेवणाच्या टेबल वरून चोरून नेल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


या संदर्भात अधिक माहिती अशी की ,अंधेरी मुंबई येथील प्रेमानंद प्रभाकर कांबळे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, आपण सतरा एप्रिल 2023 रोजी मुंबई येथून रात्री बसून शिर्डीला 18 एप्रिल 23 रोजी सकाळी साई दर्शनाला आलो. श्री साईबाबांचे दर्शन घेऊन दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान साई भोजनालय येथे जेवणासाठी गेलो. तेथे माझ्या शेजारी टेबलावर एक अनोळखी महिला बसलेली होती .मी माझी लाल निळा रंगाची बॅग तिथे ठेवून हात धुण्यास गेलो व परत आलो व नंतर माझी बॅग घेऊन मी माझ्या हॉटेलमध्ये दुसरी बॅग व फ्रेश होण्यासाठी गेलो असता तेथे लाल निळ्या रंगाची ती बॅग उघडली असता त्या बॅगेतील वीस हजार रुपये किमंतीचा मोबाईल व दहाहजार रुपये रोख रक्कम चोरीस केल्याचे दिसले.

मी आजपर्यंत शोध घेतला मात्र ती मिळून आले नाही. त्यामुळे साई भोजनालयात हात धुण्यास गेलो असताना माझ्या बॅगमधून शेजारी बसणाऱ्या अनोळखी महिने माझा वीस हजार रुपये किमंतीचा मोबाईल वर दहा हजार रुपये रोख रक्कम असे तीस हजार रुपये ची चोरी केल्याची फिर्याद प्रेमानंद प्रभाकर कांबळे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 981 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button