Letest News
राजकीय हस्तक्षेपामुळे झाली शिर्डी पोलिस यंत्रणा हतबल ?  अशा कारणांनेच वाढते आहे शिर्डीत गुन्हेगारांच... शिर्डीत दडिहंडीच्या दिवशी लागला गालबोट तिघांनी एकावर चाकूने वार करून संपवले  सिनेअभिनेत्री कंगना राणावत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्या महिलेचा खून तिच्याच पतीने केले पोलीसांनी चक्रे फिरवून पतिला घेतले ताब्यात श्री साईबाबांबद्दल चुकीच्या अफ़वा व आर्थिक फसवणूकी सह विविध विषयांवर धोरण व यंत्रणा राबवावी श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे...
अ.नगरक्राईम

pune news:-मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं मृत्यूचे कारण

Mobile hotspot became the cause of death

पुणे शहर काल हत्येच्या घटनांनी हादरले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. तर, त्याचबरोबर एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव कुलकर्णी यांचीदेखील अज्ञात व्यक्तीनी हत्या केली होती. या दोन घटनांनी पुणे शहर हादरले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

वासुदेव कुलकर्णी यांच्या हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, तीन आरोपी असून ते अल्पवयीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत होते. त्याचवेळी तीन जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. कुलकर्णी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांची हत्या का करण्यात आली, याचा शोध पोलिस घेत होते. तसंच, नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात दुसरी खूनाची घटना घडली होती.

त्यामुळं शहरातही एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी हत्येच्या तपास करत असतानाच समोर आलेली माहिती पाहून पोलिसही थक्क झाले आहेत. मोबाइलचे हॉटस्पॉट न दिल्याने वासुदेव कुलकर्णी यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे ही हत्या तीन अल्पवयीन मुलांनी केली आहे. रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत असताना त्यांच्या मोबाईलचे हॉटस्पॉट या अल्पवयीन मुलांनी मागितले. मात्र, वासुदेव यांनी हॉयस्पॉट न दिल्याने त्यांनी रागात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button