Letest News
🚨 ब्रेकिंग न्यूज | शिर्डीत पेरू विक्रेत्यांचा अचानक रास्तारोको-वाहतुक ठप्प 🚨 सुसाईड नोटमध्ये नाव- FIR मध्येही उल्लेख-तरी चार्जशीटमधून ‘अशोक खरात’ गायब — नेमकं चाललंय काय? EXCLUSIVE: ‘कॅप्टन खरात’चा प्रभाव की संगनमत? साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे मोठा कट असल्या... कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई
Blog

शिर्डीतील लक्ष्मीनगर तसेच इतर भागात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनां प्रभावीपणे राबवण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने सल्लागार समिती स्थापन!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे येथील लक्ष्मीनगर, नाला रस्ता व आंबेडकर नगर येथील शासकीय जागेतील झोपडपट्टी धारकांचे तसेच इतर घरकुल लाभार्थींशी संवाद व समन्वय साधून प्रधानमंत्री आवास योजना अथवा अन्य घरकुल योजनांचे कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच विचारविनिमय करण्यासाठी शिर्डी येथे शासनाच्या सूचनेप्रमाणे माजी नगरसेवक व लाभार्थी प्रतिनिधींची सल्लागार समिती स्थापन करण्याच्या आदेशानुसार शिर्डी येथील माजी नगरसेवक मंगेश वामन त्रिभुवन, निलेश मुकुंदराव कोते ,संध्याताई प्रकाश शेळके, सुरेश काळू आरणे,व नागरिक प्रतिनिधी साहेबराव पवार आदीं माजी नगरसेवक व लाभार्थी प्रतिनिधी यांची झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र शिर्डी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


शिर्डी येथे पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजना राबविण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यासंदर्भात 30 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी नगरपरिषदेचा प्रशासकीय ठराव क्रमांक 170 मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शिर्डी नगर परिषदेची निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत कार्यरत राहणार आहे. नगरपरिषद ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असून येथे विविध घरकुल सारख्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांचा व प्रतिनिधींचा सहभाग, समन्वय असला तर या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. म्हणूनच शासनाने नगरपरिषदेला प्रशासकीय कालावधीमध्ये घरकुल सारख्या योजना प्रभावीपणे राबवता याव्यात म्हणून माजी नगरसेवक व लाभार्थी प्रतिनिधी यांची त्यासाठी सल्लागार समिती म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या .त्याप्रमाणे ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button