Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
अ.नगरक्राईम

78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई

अहिल्यानगर (प्रतिनिधी):
अहिल्यानगर येथून विश्वासाने पाठवलेला लाखोंचा कापड मालच लंपास झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, स्थानिक गुन्हे शाखेने थेट राजस्थानपर्यंत पाठलाग करत तब्बल 78,82,184 रुपये किमतीचे 470 कापडाचे रोल जप्त करत मोठी कारवाई केली आहे.
🚛 चालक-क्लिनरच निघाले मास्टरमाइंड; 555 पैकी 470 रोल गायब
फिर्यादी अमरिशकुमार ओमप्रकाश गुप्ता (रा. अहमदाबाद, गुजरात) यांच्या कंपनीचा कापडाने भरलेला कंटेनर बेंगलोरला रवाना करण्यात आला होता. मात्र चालक संजय लिलाधर कुमार व क्लिनर लिलु मीना उर्फ नंदलाल मीना यांनी संगनमत करून 555 पैकी तब्बल 470 कापडाचे रोल परस्पर अपहार करून आर्थिक फायदा करून घेतल्याचे समोर आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🕵️‍♂️ 4 दिवस CCTV तपास; नवापूर ते राजस्थान असा थरारक पाठलाग
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले.
पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नवापूर (जि. नंदुरबार) येथे धागेदोरे मिळवत सलग चार दिवस CCTV फुटेज तपासत आरोपींचा माग काढला आणि थेट राजस्थानपर्यंत पोहोचले.
📦 राजस्थानमध्ये मुद्देमाल जप्त; 3 आरोपी ताब्यात
गुप्त माहितीच्या आधारे राजस्थानमधील सुजानगढ, चुरू आणि सिकर भागात छापे टाकत पोलिसांनी मोहम्मद युनुस सलाउद्दीन, बाबुलाल जाट आणि मोहम्मद अमिर सज्जाद यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून मनोहरठाणा (जि. झालावाड) येथे लपवून ठेवलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


⚖️ पुढील तपास सुरू; मुख्य आरोपी फरार
जप्त केलेला मुद्देमाल आणि ताब्यातील आरोपींना कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी चालक व क्लिनर अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
👏 पोलिसांची दमदार कामगिरी
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून, त्यांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button